Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांना चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा..

एकनाथ शिंदे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी चांगलं काम करावं हेदेखील शऱद पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड, देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्रीपद, उद्धव ठाकरे या सगळ्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. गेले काही दिवस विधानसभेचे आमदार […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 03:32 PM • 30 Jun 2022

follow google news

एकनाथ शिंदे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी चांगलं काम करावं हेदेखील शऱद पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड, देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्रीपद, उद्धव ठाकरे या सगळ्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी भाष्य केलं.

हे वाचलं का?

गेले काही दिवस विधानसभेचे आमदार गुवाहाटीमध्ये गेले होते. जे काही लोक आसाममध्ये गेले होते त्यांचं नेतृत्व ज्यांनी गेलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाशिवाय काही फार मागणं नसेल असं मला वाटतं. आपण मुख्यमंत्री होऊ हे कदाचित एकनाथ शिंदे यांनाही वाटलं नसेल. माझं आणि एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालं मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होणं यात काही विशेष वाटलं नाही. कारण शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यापासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेकांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर बाकीची पदं स्वीकारली आहेत त्यामुळे त्यांच्या निवडीविषय़ी मला आश्चर्य वाटलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हे क्रमांक दोनचं पद काहीसं नाराजीने स्वीकारलंय हे दिसतंय. कारण त्यांचा चेहराही तेच सांगत होता. ते ज्या पक्षात आहेत त्यात एकदा आदेश आला की त्यात तडजोड होत नाही हेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? असं विचारलं असता ते म्हणाले की महाविकास आघाडीचा प्रयोग चांगलाच होता तो फसला नाही. मात्र एकनाथ शिंदे हे जास्त प्रभावी ठरले. ३८ आमदारांना बाहेर घेऊन जाणं, त्यांना इतके दिवस सोबत ठेवणं ही सोपं नाही. पक्ष म्हटला की बंडं होत असतात. कुठलाही मोठा पक्ष लगेच संपला हे असं होतं नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि त्यांनी जे काही काही आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केले त्यात काही तथ्य नाही हे पण शरद पवार यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्यावर हे आरोप केले गेले की त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली या आरोपांकडे कसं बघता? हा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी म्हटलं आहे की ह पोरकटपणाचे आरोप आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही.

    follow whatsapp