Rahul Gandhi लग्न कधी करणार? अशी हवी आहे मुलगी…

Rahul Gandhi told when and whom he would marry : जम्मु-काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ते कधी लग्न करणार? त्यांना नेमकी कशी मुलगी हवी? आपल्याला जीवनसाथी कोणासारखा हवा? याबाबत त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले जातात. मात्र आता स्वतः राहुल गांधी यांनीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. याशिवाय त्यांचा […]

Mumbai Tak

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

follow google news

Rahul Gandhi told when and whom he would marry :

हे वाचलं का?

जम्मु-काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ते कधी लग्न करणार? त्यांना नेमकी कशी मुलगी हवी? आपल्याला जीवनसाथी कोणासारखा हवा? याबाबत त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले जातात. मात्र आता स्वतः राहुल गांधी यांनीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

याशिवाय त्यांचा पहिला पगार, डाएट, वर्कआउट, आवडती डिश ते पंतप्रधान झाल्यानंतर कोणती गोष्ट पहिल्यांदा करणार अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तर दिली आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी फूड चॅनल ‘कर्ली टेल्स’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

राहुल गांधी लग्न कधी करणार?

‘कर्ली टेल्स’च्या कामिया जानी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, मी लग्नाच्या विरोधात नाही. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं ते खूप सुंदर नातं होतं. तुमच्या काही अपेक्षा किंवा चेकलिस्ट आहे का? यावर राहुल गांधी म्हणाले, माझ्यासाठी कोणतीही चेकलिस्ट नाही. पण फक्त एक प्रेमळ आणि बुद्धिमान जीवनसाथी असावा. तो मिळाला की मी लग्न करणार, असं ते म्हणाले.

राहुल गांधींचा पहिला पगार किती होता?

राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या पहिल्या पगाराबाबतही सांगितलं. आपल्या पहिल्या नोकरीबद्दल बोलताना ते म्हणाले, मी २५ वर्षांचा असताना लंडनमधील ‘मॉनिटर’ नावाच्या कंपनीत सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी माझा पहिला पगार खूप होता. अडीच ते तीन हजार पाऊंड्स असा पगार होता. तो पगार घरभाडे आणि इतर गरजेच्या गोष्टींमध्येच जात असे, असं देखील राहुल गांधी यांनी सांगितलं.

पंतप्रधान झाल्यानंतर राहुल गांधी काय करणार?

राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार याबाबतही भाष्य केलं. “मी पंतप्रधान झालो तर प्रथम शिक्षण पद्धतीत बदल करणार. याशिवाय मध्यम-उद्योगांना मदत करणार. याबरोबरच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसह कठीण परिस्थितीतून जात असलेल्या लोकांच्या पाठीशी उभं राहणार, असं त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ राहुल गांधी यांच्या YouTube चॅनेलवर बघता येऊ शकतो.

    follow whatsapp