Andheri East by poll : ठाकरे गटाला मिळाला काँग्रेसचा ‘हात’ : पण निवडणुकीत किती महत्वाचा?

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतं आहे. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच मोठी आणि महत्त्वाची निवडणूक आहे. दरम्यान या निवडणुकीत आता ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे इथं आता महाविकास आघाडी (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी थेट […]

Mumbai Tak

मुंबई तक

10 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:47 AM)

follow google news

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतं आहे. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच मोठी आणि महत्त्वाची निवडणूक आहे. दरम्यान या निवडणुकीत आता ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे इथं आता महाविकास आघाडी (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी थेट लढत बघायला मिळणार आहे.

हे वाचलं का?

सोमवारी दुपारी काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे आदी काँग्रेसचे नेते मातोश्रीवर गेले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, अॅड अनिल परब हेही उपस्थित होते.

काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेसाठी किती महत्वाचा?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये विभागला आहे. यात शिवसेनेचे चार, भाजपचे तीन आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक होते. त्यामुळे इथं काँग्रेसची ताकद असल्याचे दिसून येतं. शिवाय हा मतदारसंघ मराठी, ख्रिश्चन, मुस्लीम, दलित, भिक्खू आणि उत्तर भारतीय अशा मिश्र लोकवस्तीचा आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, इथला ख्रिश्चन समुदाय हा पूर्वीपासून काँग्रेसला मतदान करत आहे. त्यामुळे ही मत मिळविण्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेसची मदत होऊ शकते. याशिवाय, अमराठी मतं शिवसेनेकडं वळवण्यासाठी या मतदारसंघातील काँग्रेस नेते सुरेश शेट्टी यांची मदत घेतली जाऊ शकते. या सगळ्या समिकरणांमुळेच या निवडणुकीत शिवसेनेला जिंकण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे.

मिलिंद देवरांचा विरोध :

अंधेरीतील या समिकरणांचा विचार करुन ठाकरे गटाला ही जागा सोडण्याऐवजी इथं काँग्रेसनेही उमेदवार उभा करायला हवा, असं मत काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मांडलं होतं. अंधेरी (पूर्व) पोटनिवडणूक जशी शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट आहे, तशीच ती काँग्रेससाठीही आहे, असंही देवरा म्हणाले होते.

    follow whatsapp