देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, काँग्रेस नेतृत्वहिन पक्ष : विखे पाटील

मुंबई तक

• 06:13 AM • 27 Sep 2022

सांगली : काँग्रेसकडे नेतृत्व राहिले नाही, ‘भारत जोडो’पेक्षा काँग्रेस छोडो सुरू आहे त्याकडे राहुल गांधींनी लक्ष दिले पाहिजे, असा टोला राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला लगावला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी एनडीडीबीने पुढाकार घ्यावा, अमूल किंवा मदर डेअरी पुढे आले तर तो पर्याय ही आम्ही ठेवला आहे, […]

Mumbaitak
follow google news

सांगली : काँग्रेसकडे नेतृत्व राहिले नाही, ‘भारत जोडो’पेक्षा काँग्रेस छोडो सुरू आहे त्याकडे राहुल गांधींनी लक्ष दिले पाहिजे, असा टोला राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला लगावला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी एनडीडीबीने पुढाकार घ्यावा, अमूल किंवा मदर डेअरी पुढे आले तर तो पर्याय ही आम्ही ठेवला आहे, शेतकऱ्यांचे नुकसान नको, असेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसकडे नेतृत्व राहिले नाही, ‘भारत जोडो’पेक्षा काँग्रेस छोडो सुरू आहे त्याकडे राहुल गांधींनी लक्ष दिले पाहिजे. एक राष्ट्रीय पक्ष असूनही अध्यक्ष पदाबद्दल जी सूंदोपसूंदी सुरू आहे, त्यानंतर लोकांनी आशेने कोणाकडे पहायचे? असा सवाल विचारत मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, देशाला मोदींजीशिवाय पर्याय नाही. आज दिसते की काँग्रेसला नेतृत्व राहिले नाही. ते दिशाहीन झाले आहे. त्यामुळे देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असंही विखे पाटील यांनी म्हटलंय.

लंपीरोग महाराष्ट्रामधील ३१ जिल्ह्यात पसरला असला तरी, मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यामुळे मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण ठेवता आले आहे. राज्यस्थान आणि पंजाबमध्ये जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा तुलनेने महाराष्ट्रामध्ये स्थिती चांगली आहे, असा दावाही विखे पाटील यांनी केला.

महानंदाची स्थिती बिकट झाली असून, आम्ही प्रशासक नेमला आहे. महानंदाच पुनरुज्जीवन करण्यासाठी जर एनडीडीबी पुढे येत असेल तर तो पर्याय आम्ही ठेवला आहे. अमूल किंवा मदर डेअरी पुढे आले तर तोही पर्याय आम्ही ठेवला, शेतकऱ्यांचे नुकसान नको, ही आमची भूमिका आहे. राज्यातील सहकारी दूध संघाच अपयश हे शेतकऱ्यांनी का सोसायचे? राज्यातील काही दूध संघांनी अनुदानात अपहार केला आहे, त्याच्या चौकशीचा आदेश आम्ही देत असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

    follow whatsapp