भ्रष्टाचाराचा मुद्दे काढले, आता अजितदादांना पहिला धक्का, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी

Pimpri Chinchwad Mahanagar Palika Election : एकीकडे अजित पवारांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये होणारी इन्कमिंग ही अजित पवारांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

03 Jan 2026 (अपडेटेड: 03 Jan 2026, 05:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भ्रष्टाचाराचा मुद्दे काढले, आता अजितदादांना पहिला धक्का

point

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी

Pimpri Chinchwad Mahanagar Palika Election : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराचे मुद्दे जोरकसपणे उपस्थित करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपने पहिला राजकीय धक्का दिलाय. कारण, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, भाजपने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेही खातं उघडलं आहे. एकीकडे अजित पवारांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये होणारी इन्कमिंग ही अजित पवारांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

हे वाचलं का?

एकीकडे अजितदादांची कडाडून टीका, तिकडं भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या दोन विजयांमुळे भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. निवडणूक रिंगणात विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आणि हा विजय भाजपसाठी मनोबल वाढवणारा ठरला आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या पक्षाबाबत तुम्ही बोलत आहात,भाजपचा अजित पवारांना निर्वाणीचा इशारा

महत्त्वाचं म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होत असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बिनविरोध झालेल्या नगरसेविकेची पहिली प्रतिक्रिया 

दरम्यान, बिनविरोध नगरसेवक झाल्यानंतर सुप्रिया चांदगुडे म्हणाल्या, मला शक्यता वाटत नव्हती मी बिनविरोध होईल. कारण हा जनतेचा विश्वास आहे. सगळ्यांच्या सहकार्यांनी हा विजय मिळवला आहे. मी कामाच्या बाबतीत महिलांना प्राधान्य देणार आहे. रस्त्यासाठी काम करणार आहे. 

भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून अजित पवारांवर टीका करणे टाळलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांना भाजपचे वरिष्ठ नेते प्रत्युत्तर देतील, अशी भू्मिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शिवाय भाजपचाच महापौर होणार, असा विश्वासही स्थानिक कार्यकर्ते बोलताना पाहायला मिळत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नवी मुंबई: पत्नी आणि तिच्या मामाकडून अश्लील व्हिडीओ पाठवून छळ, सतत चॅटिंग अन्... अखेर, तरुणाचं टोकाचं पाऊल

    follow whatsapp