मुंबई: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे लसीकरण आता खासगी रुग्णालयात देखील सुरु झालं आहे. सुरुवातीला हे लसीकरण फक्त सरकारी रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच सुरु होतं. मात्र आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली आहे. यात मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मुंबई महापालिकेने यादी देखील जारी केली आहे. पाहा कोणकोणत्या रुग्णालयात कोरोनावरीवल लस उपलब्ध असणार.
ADVERTISEMENT
‘या’ 29 रुग्णालयात मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
-
शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
-
के. जे. सोमय्या रुग्णालय
-
डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय
-
वॉकहार्ट रुग्णालय
-
सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
-
सैफी रुग्णालय
-
पी. डी. हिंदुजा रुग्णालय
-
डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय
-
कौशल्य मेडिकल फाऊंडेशन
-
मसीना रुग्णालय
-
हॉली फॅमिली रुग्णालय
-
एस. एल. रहेजा रुग्णालय
-
लिलावती रुग्णालय
-
गुरु नानक रुग्णालय
-
बॉम्बे रुग्णालय
-
ब्रीच कँडी रुग्णालय
-
फोर्टिस, मुलुंड
-
द भाटिया जनरल रुग्णालय
-
ग्लोबल रुग्णालय
-
सर्वोदय रुग्णालय
-
जसलोक रुग्णालय
-
करुणा रुग्णालय
-
एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय
-
SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय
-
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय
-
कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय
-
सुरुणा शेठिया रुग्णालय
-
हॉली स्पिरीट रुग्णालय
-
टाटा रुग्णालय
ही बातमी पाहिली का?: खासगी हॉस्पिटलमध्ये २५० रुपयांमध्ये मिळणार कोरोनावरील लस!
दरम्यान, खासगी रुग्णालयातील लसीकरणाच्या एका डोससाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. हा दर सरकारकडूनच निश्चित करण्यात आला आहे. या २५० रुपयांमध्ये १०० रुपये सर्विस चार्ज तर १५० रुपये लसीच्या डोसची किंमत असणार आहे. सरकारी रुग्णालयात होणारं लसीकरण मात्र मोफत होणार आहे.
ADVERTISEMENT
