अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हे मंदिर ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरातून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला सुमारे ३ ते […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:14 AM • 27 Feb 2021

follow google news

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हे मंदिर ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

हे वाचलं का?

अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरातून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला सुमारे ३ ते ४ लाख भाविक येतात. त्यामुळे गर्दी होते. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवाऱी म्हणजेच २ मार्चला अंगारकी चतुर्थी आहे. त्या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे

मंदिरात खबरदारी म्हणून सर्व सुविधा ; हार, नारळ स्वीकारणे बंद

पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्वीकारणे बंद केले आहे. तसेच येणा-या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे.

    follow whatsapp