दिल्लीत शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?

मुंबई तक

• 10:11 AM • 27 Jan 2021

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अचानक आंदोलक हातघाईवर का आले, असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे दीप सिद्धू कोण होता, तो शेतकरी आंदोलनात कसा […]

Mumbaitak
follow google news

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अचानक आंदोलक हातघाईवर का आले, असा प्रश्न विचारला जातोय.

हे वाचलं का?

त्यामुळे दीप सिद्धू कोण होता, तो शेतकरी आंदोलनात कसा पोचला, आणि त्याचं नेमकं कनेक्शन काय, याची लोकांमध्ये खूप चर्चा होतेय.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. काही शेतकरी नेत्यांनी लाल किल्ल्यातल्या हिंसाचारासाठी दीप सिद्धू आणि किसान मजदूर संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

लाल किल्ल्यात शिरून तिथे जो निशाण साहीब झेंडा फडकावण्यात आलाय, त्यामागंही दीप सिद्धूचाच हात असल्याचं म्हटलं जातंय. झेंडा फडकवण्याची ही घटना घडली तेव्हाही दीप सिद्धू तिथे उपस्थित होता. त्यामुळे दीप सिद्धूनेच आंदोलकांना भडकावलं आणि त्यांची दिशाभूल केली, असा आरोप भारतीय किसान युनियन हरयाणाचे प्रमुख गुरनाम सिंह चढूनी यांनी केलाय. तसंच तो सरकारचा दलाल असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू हा पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. लॉचं शिक्षण घेतलेल्या दीपने किंगफिशर मॉडेल हंड अवॉर्डही जिंकला. २०१५ मध्ये त्याचा पहिला पंजाबी सिनेमा रमता जोगी रिलिज झाला. पण तो चर्चेत आला ते २०१८ मध्ये आलेल्या जोरा दस नुम्बरियाया सिनेमानं. या सिनेमात त्याने एका गॅगस्टारचा रोल केला होता.

दीप सिद्धूची ही झाली प्रोफेशनल ओळख. पण या ओळखीला जोडूनच दीप सिद्धूची नवी ओळख तयार झालीय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला तिकीट दिलं होतं. यावेळी दीप सिद्धू सनी देओलचा प्रचार करताना दिसला होता.

त्याच्यावरच्या आरोपांंचं कनेक्शन जोडण्यासाठी एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला जातोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत दीप सिद्धू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सनी देओल यांच्यासोबत दिसतो. याच फोटोचं कनेक्शन जोडून दीप सिद्धू हा आरएसएस आणि भाजपचा एजंट असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला. आता आंदोलन चिघळल्यावरही दीप सिद्धूचा नरेंद्र मोदी, सनी देओलसोबतचा तो फोटो पुन्हा व्हायरल झालाय.

या व्हिडिओमधून समजून घ्या दीप सिद्धू कोण आहे, आणि त्याचं आंदोलनाशी नेमकं कनेक्शन काय?

    follow whatsapp