VIDEO : धैर्यशील मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची गाडी थांबवली, सोलापुरात नेमकं काय घडलं?

Dhairyasheel Mohite Patil and Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.24) सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांची गाडी थांबवली.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:38 AM • 25 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापुरात गेल्या काही दिवसांत ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये.

point

मराठवाड्यासह सोलापुरातील अनेक नद्यांना महापूर आलाय.

Dhairyasheel Mohite Patil and Devendra Fadnavis : सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला गेल्या 15 दिवसांत पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांना महापूर आलाय. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हेरावून घेतलाय. महापूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दरम्यान, सोलापूर आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात पाहाणी दौरा केला. दरम्यान, सोलापुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Dhairyasheel Mohite Patil) यांची गाडी धैर्यशील मोहिते पाटलांनी थांबवलेली पाहायला मिळाली. मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) वेगळ्या मार्गाने पुढे जावं, ही मागणी करण्यासाठी त्यांची कार थांबवली होती. 

हे वाचलं का?

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची देवेंद्र फडणवीसांकडून  पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.25) सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. लातूर, माढा आणि अन्य काही तालुक्यांमध्ये जात त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, लोकांना सर्वप्रकारची मदत सरकार करणार आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करताना राज्य सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

हेही वाचा : 5 लाखांहून अधिकचा खर्च येणाऱ्या 9 दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी निधी मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय

शेतकरी बांधवांचे संसार वाहून गेल्याचं दृश्य अधिकच मनाला वेदना देणारं - अजित पवार 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर दौरा केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीनं पिकांची नासधूस झाली आहे. पुरात शेतकरी बांधवांचे संसार वाहून गेल्याचं दृश्य अधिकच मनाला वेदना देणारं आहे. पशुधनाचं देखील फार नुकसान झालं. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना धीर देणं हे माझं काम आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना सावरण्यास बळ मिळेल. पुराच्या पाण्यात घरांचं, व्यवसायाचं व संसारिक झालेल्या नुकसानाचं दुःख हे आभाळाएवढं आहे. पण या कठीण प्रसंगी आपलं हक्काचं महायुती सरकार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शिलेदार मदतकार्य पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत. ह्या आपत्तीच्या काळात माझा शेतकरी एकटा अजिबात नाही; सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असं अजित पवार म्हणाले. 


 

    follow whatsapp