डोंबिवलीत पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती! नरामधम बापाचा 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्याच्या भयावह घटना समोर येत असून, गेल्या महिन्या पिंपरी चिंचवडमध्ये बापानेच मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेची डोंबिवलीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. बापाने पोटच्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वासनांध बापाने बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी भयंकर घटना डोंबिवलीत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:26 AM • 30 Oct 2021

follow google news

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्याच्या भयावह घटना समोर येत असून, गेल्या महिन्या पिंपरी चिंचवडमध्ये बापानेच मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेची डोंबिवलीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. बापाने पोटच्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

हे वाचलं का?

वासनांध बापाने बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी भयंकर घटना डोंबिवलीत घडली आहे. नराधम बापाने पोटच्या 9 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार करून आठ महिन्यांच्या चिमुकलीला दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आरोपीनं पत्नीलाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

भयंकर घटना! मित्रासोबत बसस्थानकात बसलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

घटना काय?

डोंबिवलीत एक 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई, बहीण आणि वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेलेली होती. यावेळी वासनांध झालेल्या बापाने तिच्याशी लगट करत बलात्कार केला. नराधम बाप तितक्यावरच थांबला नाही.

नंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीला शिवीगाळ मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. झालेल्या आघाताने मुलगी घाबरून गेली. तिने आई परतल्यानंतर तिला घडलेली घटना सांगितली.

पुणे : बापच निघाला नराधम; 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन आरोपीनं भांडण केलं. आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजली. त्याला विरोध करणाऱ्या पत्नीला देखील नराधमाने बेदम मारहाण केली. या सर्व धक्कादायक प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्यात. विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांचा मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिला तपास करत आहेत.

    follow whatsapp