डोंबिवली: सिलेंडरमधून ‘अशी’ करायचे गॅसची चोरी, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई तक

19 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली जवळील हेदुटणे गावात भर रस्त्यावर बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची रिफिलिंग करणाऱ्या दोन आरोपींच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बाळप्पा उनगप्पा ईरगदिन व महेश गुप्ता असे अटक आरोपीचे नाव असून हे आरोपी लोखंडी पिन व पाईपच्या सहाय्याने कमर्शियल गॅस सिलिंडरमधून घरगुतीगॅस सिलेंडरमध्ये चोरी करत गरजू लोकांना दुप्पट किमतीत विक्री करत असल्याची माहिती समोर […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली जवळील हेदुटणे गावात भर रस्त्यावर बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची रिफिलिंग करणाऱ्या दोन आरोपींच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बाळप्पा उनगप्पा ईरगदिन व महेश गुप्ता असे अटक आरोपीचे नाव असून हे आरोपी लोखंडी पिन व पाईपच्या सहाय्याने कमर्शियल गॅस सिलिंडरमधून घरगुतीगॅस सिलेंडरमध्ये चोरी करत गरजू लोकांना दुप्पट किमतीत विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

हेदुटने शिरढोण रोडवर एका वीटभट्टीच्या मागे गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी होत असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने प्राप्त माहिती व फोटोवर तपास करीत टेम्पोवरील मोबाईल नंबरवर फोन करून टेम्पो चालक विनोदकुमार रामशब्द यादव ( वय 35) याला सोनारपाडा येथून अटक केली.

त्याने महेश गुप्ता याला भारत गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी टेम्पो दिला होता. तो गॅसचा काळाबाजार करत असल्याचं माहित झाल्याने त्याने महेशकडून टेम्पो परत घेतला होता. यादव यांच्याकडून महेशची माहिती काढत गुन्हे शाखा घटक 3 ने डोंबिवलीतून महेश व बाळप्पा यांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून 12 डोमेस्टिक सिलेंडर व 2 मोबाइल जप्त करण्यात आले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करत त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी हे भारत गॅसचे घरगुती सिलेंडरमधून लोखंडी पोकळ नोजलचे सहायाने कमर्शियल सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत होते. त्यानंतर ते ग्राहकांना कमी वजनाचे गॅस विक्री करत असत.

‘नॉनमॅट्रिक माणसाने उद्धवजींना असंस्कृत म्हणणं यासारखं…’, राणेंवर कोणी केली बोचरी टीका?

    follow whatsapp