आमदार आशिष जैस्वाल यांना मंत्री करू नका, कारण…; भाजप जिल्हा प्रमुखाची मागणी

–योगेश पांडे, नागपूर आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांना मंत्री करू नका, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वीच शिंदेगटाच्या आमदारांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजप नागपूर जिल्हा ग्रामविकासआघाडीचे जिल्हा प्रमुख राजेश ठाकरे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेले […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:50 AM • 10 Jul 2022

follow google news

योगेश पांडे, नागपूर

हे वाचलं का?

आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांना मंत्री करू नका, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वीच शिंदेगटाच्या आमदारांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजप नागपूर जिल्हा ग्रामविकासआघाडीचे जिल्हा प्रमुख राजेश ठाकरे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेले व माजी शिवसैनिक असलेले नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा क्षेत्राचेअपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षामधूनच बंडाचा झेंडा उभारण्यात आलेला आहे.

भाजपच्या नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेश ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जयस्वाल यांच्यावरभ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. जयस्वाल आणि त्यांच्या नातेवाईक व निकटवर्ती यांच्या संपत्तीची ईडी, सीबीआय चौकशीकरण्याची मागणी केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळ स्थान देण्यात येऊ नये अशी सुद्धा मागणी केली आहे.

राजेश ठाकरे म्हणाले की आमदार आशिष जैस्वाल हे खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिजसंपदेची मोठी लूट केली असून शेतातून माती मिश्रित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांनी नदीलगतच्या जमिनीनातेवाईक व निकटवर्ती यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत.

शासनाचा 150 कोटी रुपयांचा महसूल जैस्वाल यांनी बुडवला असल्याचा गंभीर आरोप राजेश ठाकरे यांनी केला आहे. आशिषजयस्वाल या भ्रष्टाचारी व्यक्तीला मंत्री करू नका त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी राजेश ठाकरे यांनी केली असूनदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राजेश ठाकरे म्हणाले आहेत.

    follow whatsapp