सध्या राज्यभरात NCB ने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मुंबईच्या NCB युनिटने केलेल्या कारवाईमुळे सध्या राज्य सरकार विरुद्ध NCB असा सामना रंगताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला ड्रग्ज हे तालुका आणि छोट्या शहरांपर्यंत येऊन पोहचले आहेत. या गोष्टींचं समुळ उच्चाटन करण्याची गरज आहे. राज्य सरकार त्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलत असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षापदी निवड झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रूपाली चाकणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या भाषणात, मागील महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मोठा निर्णय घेणार? फेसबूक पोस्ट चर्चेत
महिलांच्या दीक्षा कायद्या बाबत मागील दोन वर्षापासून चर्चा असून त्यावर भाष्य करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दीक्षा कायद्याबाबत अनेक व्यक्तिचे मार्गदर्शन घेण्यात आले असून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचा प्रारुप आराखडा मंजूर केला जाईल,अशी घोषणा त्यांनी केली.तसेच महिला किंवा लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीकडून होत आहेत. अशी माहिती समोर आली असून त्याचे प्रमाण 95 टक्के इतके आहे. त्या दृष्टीने येत्या काळात प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून,त्यांच्या भावना जाणून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, महिला वरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.त्या दृष्टीने राज्य सरकार अनेक पावले उचलत आहे.त्याचाच एक भाग म्हणून केवळ महिलावरील सर्व प्रकाराच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी,राज्यातील प्रत्येक शहरात एक पोलिस स्टेशन असेल, तीथे महिला आपल्या तक्रारी मांडू शकतील आणि तेथील पूर्ण काम महिला पोलिस अधिकारीच पाहतील, याबाबतची घोषणा लवकरच राज्य सरकार करेल,असे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT











