बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी या पाचही राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली. या पाचही राज्यांमध्ये आता निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. भाजप, काँग्रेस आणि या राज्यांमधल्या इतर प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना नियमावलीचं पालन करून निवडणुका पार पडणार आहेत. यासंदर्भात आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
असा आहे पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम
तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार
६ एप्रिलला होणार मतदान
आसाम
पहिला टप्पा- २७ मार्च
दुसरा टप्पा- १ एप्रिल
तिसरा टप्पा- ६ एप्रिल
पुद्दुचेरी
एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिलला होणार मतदान
केरळ
एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिलला होणार मतदान
पश्चिम बंगाल
आठ टप्प्यात निवडणूक
पहिला टप्पा – २७ मार्च
दुसरा टप्पा १ एप्रिल
तिसरा टप्पा – ६ एप्रिल
चौथा टप्पा – १० एप्रिल
पाचवा टप्पा- १७ एप्रिल
सहावा टप्पा-२२ एप्रिल
सातवा टप्पा-२६ एप्रिल
आठवा टप्पा २९ एप्रिल
या पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
