Sanjay Kadam : पक्षप्रवेशाला ठाकरे उपस्थित; दापोलीत कसं बदलणार राजकारण?

मुंबई तक

05 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:58 PM)

Uddhav Thackeray Public Meeting in Khed खेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी आज (रविवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास कदम, विजय मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray Public Meeting in Khed

हे वाचलं का?

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी आज (रविवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास कदम, विजय मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी ठाकरे यांनी कदम यांचं पक्षात स्वागत केलं. (Ex MLA Sanjay Kadam from khed-Dapoli Assembly join Shivsena-UBT Party in presence of Uddhav Thackeray)

यावेळी बोलताना कदम यांनी संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. तसंच आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सभापती बसवू, असा निर्धार व्यक्त केला. याशिवाय रामदास कदम यांची ताकद शिल्लक राहिली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार द्याल त्याला निवडून देऊ असं आश्वासनही दिलं.

Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना

दापोलीत कसं बदलणार राजकारण?

दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ला समजला जातो. इथं मागील वेळी योगेश कदम निवडून आले होते. पण, कदम यांनी वेगळी वाट धरल्याने त्यांना आव्हान देणारा तगडा चेहरा म्हणून ठाकरेंनी माजी आमदार संजय कदम यांना पुढे आणलं असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यांना ताकद देण्यासाठीच आज थेट ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला असण्याची शक्यता आहे.

‘देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून टाकू’ : ठाकरेंकडून CM शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार

संजय कदम हे मूळचे शिवसेनेचे. पण २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते आमदारही झाले. पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव केला. आता त्यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळेच संजय कदम हेच ठाकरे गटाकडून रामदास कदम, योगेश कदम यांच्या विरोधात उमेदवार असणार हे नक्की आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.

    follow whatsapp