Crime News : एका 36 वर्षीय व्यावसायिकाची फूड डिलिव्हरी एजंट्सनी हेल्मेटने मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नवी दिल्लीतील कनॉट प्लेस या भागातील ही घटना आहे. शिवम गुप्ता असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवम यांनी रुग्णालयात तब्बल 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'कोरियन गेम'च्या नादात तिघींनी गमावला जीव; मधल्या बहिणीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर...
अंधारात केला हल्ला
ही घटना अतिशय क्षुल्लक वादातून आणि चुकीच्या ओळखीमुळे घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नवी दिल्लीचे डीसीपी देवेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचा कनॉट प्लेसमध्ये पाणी पिण्यावरून दुसऱ्या एका तरुणाशी वाद झाला होता. त्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी आरोपीने आपल्या दोन साथीदारांना तेथे बोलावले. मात्र, अंधार आणि गैरसमजामुळे त्यांनी त्या तरुणाऐवजी तेथून जाणाऱ्या शिवम गुप्ता यांना पकडले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला.
हेल्मेटने मारुन केली हत्या
आरोपींनी शिवम यांच्यावर हेल्मेटने इतक्या निर्घृणपणे वार केले की ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. ३ जानेवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांना लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात आणि नंतर राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
हे ही वाचा : कोरियन गेम खेळणाऱ्या मुलींच्या वडिलांचा मेहुणीशी दुसरा विवाह, दोघीही सोबतच... कुटुंबाची हिस्ट्री आली समोर
पोलिस तपास काय सांगतो?
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सच्या मदतीने दोन डिलिव्हरी एजंट्सना अटक केली आहे, तर तिसऱ्या आरोपीची चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी शिवम गुप्ता एका पार्टीवरून परतत होते. काहीही संबंध नसताना केवळ संशयावरून आणि चुकीच्या ओळखीमुळे एका निष्पाप व्यक्तीचा अशा प्रकारे बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











