हुश्श… ‘सोशल’ जीवन पूर्वपदावर! 6 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा पूर्ववत

मुंबई तक

• 03:19 AM • 05 Oct 2021

दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडल्यानं सगळ्यानांच चुकचुकल्यासारखे झाले. सोमवारी रात्री अचानक तिन्ही सोशल मीडियाचं सर्व्हर डाऊन झाल्याचा परिणाम जगभरात दिसून आला. त्यानंतर सहा तासांनी व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू झाली. संवाद आणि व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा बनला आहे. व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकला सरावलेल्या […]

Mumbaitak
follow google news

दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडल्यानं सगळ्यानांच चुकचुकल्यासारखे झाले. सोमवारी रात्री अचानक तिन्ही सोशल मीडियाचं सर्व्हर डाऊन झाल्याचा परिणाम जगभरात दिसून आला. त्यानंतर सहा तासांनी व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू झाली.

हे वाचलं का?

संवाद आणि व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा बनला आहे. व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकला सरावलेल्या नेटकऱ्यांचा सोमवारी गोंधळ उडाला. सोमवारी रात्री व्हाट्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या फेसबुकच्या मालकीच्या तिन्ही सेवा बंद पडल्या.

व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक बंद पडल्याचं लक्षात यायला अनेकांना वेळ लागला. संवादासाठी हल्ली महत्त्वाचं झालेलं व्हॉट्स अ‍ॅपही बंद पडल्यानं अनेकांची कामं खोळंबल्याचंही बघायला मिळालं. व्हॉट्सवरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते.

सेवा बंद पडल्यानं सगळीकडे गोंधळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. सेवा पूर्वपदावर आल्याचं कळाल्यानंतर जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

What’s App, Instagram आणि फेसबुक डाऊन; ‘ट्विटर’वर खिल्ली उडवणाऱ्या ‘मीम्स’चा पूर

व्हॉट्स अॅपने व्यक्त केली दिलगिरी

‘आज व्हॉट्स अ‍ॅप वापरता आलं नाही, याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही हळूहळू आणि काळजीपूर्वक व्हॉट्स सुरू करत आहोत. तुम्ही संयम बाळगल्याबद्दल आभार. याबद्दलची अधिकची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू’, असं व्हॉट्स अॅपने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून म्हटलं आहे.

मार्क झुकेरबर्ग म्हणाला ‘सॉरी’

मार्क झकरबर्गनेही फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. खंडित झालेली सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ‘फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सेवेत खंड पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला कल्पना आहे की, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात’, असं मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा वर्षाव सुरू झाला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अ‍ॅप डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरसोबत तुलना करत मीम्सच्या माध्यमातून टिंगल उडवली.

    follow whatsapp