विदेशी नेत्यांना मिठी मारुन, बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाही, मनमोहन सिंहांचा मोदींवर हल्लाबोल

सध्या देशात पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचही राज्यांमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षावर वारंवार टीकेची झोड उठवत आहेत. मोदींच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. एका व्हिडीओ मेसेजद्वारे डॉ. मनमोहन सिंह यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:29 PM • 17 Feb 2022

follow google news

सध्या देशात पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचही राज्यांमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षावर वारंवार टीकेची झोड उठवत आहेत. मोदींच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. एका व्हिडीओ मेसेजद्वारे डॉ. मनमोहन सिंह यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे वाचलं का?

विदेशी नेत्यांना मिठी मारुन आणि बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत असा टोला डॉ, मनमोहन सिंह यांनी लगावला आहे.

सत्ताधारी आपल्या चुकांसाठी नेहरुंना धरत आहेत जबाबदार –

निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी अनेकदा पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या ध्येयधोरणांवर टीका केली होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी हाच धागा पकडत नरेंद्र मोदींना सुनावलं आहे. भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि राज्यातील लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशाची स्थिती अशी आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत तर गरीब अजून गरीब होत चालले आहेत.

दररोज ४९ कोटींची उलाढाल होणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचं काम योगीच्या इशाऱ्यावर कसं चालायचं?

कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं लोक आर्थिक समस्या, बेरोजगारी, वाढत्या महागाईनं चांगलेच त्रस्त झाले आहे. साडेसात वर्ष सरकार चालवल्यानंतरही भाजप सरकार आपल्या चुका मान्य करायला तयार नाही. परंतू भाजप सरकार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार ठरवत आहे, असं म्हणत मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे.

Bank Loan Fraud Case : एबीजी शिपयार्डसह प्रमोटर्सविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

यावेळी मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारला महत्वाचा सल्ला दिला. “सरकारने आतातरी ही गोष्टही लक्षात घ्यावी की केवळ वरवरचा दिखाऊपणा केल्यामुळे परिस्थिती बदलत नसते. खरं कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रुपात दिसून येतच. मोठ्या मोठ्या गोष्टी केवळ बोलणं सोपं असतं मात्र त्यावर अंमलबजावणी करणं कठीण असतं. मी आशा व्यक्त करतो की सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट आता लक्षात आली असेल.”

देशातील मुस्लिम महिला मला आशीर्वाद देतात कारण मी…: PM मोदी

सध्याच्या केंद्र सरकारचा राष्ट्रवाद हा नकली राष्ट्रवाद असून तो देशासाठी धोकादायक आहे. इंग्रजाच्या फोडा आणि राज्य करा या नितीवर सध्याच्या केंद्र सरकारचा राष्ट्रवाद आधारित असल्याचं मनमोहन सिंह म्हणाले. परराष्ट्र धोरणाच्या निकषांवर हे सरकार कमजोर पडत असून संविधानीक संस्थांना कमकुवत केलं जात असल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी केला.

    follow whatsapp