लसीकरणात ‘या’ व्यक्तींना मिळणार प्राधान्य, सरकारकडून निकष जाहीर

मुंबई तक

• 02:50 PM • 27 Feb 2021

१ मार्चपासून देशभरात सर्वसामान्य जनतेसाठी कोरोनाचं लसीकरण हाती घेतलं जाणार आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. नवीन वर्षात देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांना ही लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सरकार आता सर्वसामान्यांनाही लस देणार आहे. मात्र या लसीकरणासाठी केंद्र […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

१ मार्चपासून देशभरात सर्वसामान्य जनतेसाठी कोरोनाचं लसीकरण हाती घेतलं जाणार आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. नवीन वर्षात देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांना ही लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सरकार आता सर्वसामान्यांनाही लस देणार आहे. मात्र या लसीकरणासाठी केंद्र सरकारने काही नियम आणि निकष आखले आहेत.

हे वाचलं का?

४५ ते ६० वयोगटापर्यंत व्यक्तींना देखील कोरोनाची लस मिळणार आहे. मात्र यासाठी ज्या व्यक्तींची तब्येत खराब आहे अशा लोकांना पहिले प्राधान्य दिलं जाईल. यासाठी केंद्र सरकारने २० आजारांची यादी जाहीर केली असून हार्ट फेल्युअर, डायबिटीस, किडनीचे आजार, कॅन्सर, एचआयव्ही अशा आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यांत हे लसीकरण फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये होत होतं. आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली असून या लसीकरणासाठी २५० रुपये एवढा दर निश्चीत करण्यात आला आहे. २५० रुपयांमध्ये १०० रुपये सर्विस चार्ज तर १५० रुपये लसीच्या डोसची किंमत असणार आहे. सरकारी रुग्णालयात होणारं लसीकरण मात्र मोफत होणार आहे.

प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या लसीकरणाबद्दल केंद्र सरकार लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लसीची एक किंमत ठरवली जाणार आहे, मात्र या किमतीवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये केंद्र सरकार खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp