अजित पवारांनी त्यांची चूक सुधारली, पण उद्धव ठाकरेंची… -गुलाबराव पाटील

मुंबई तक

16 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

शिंदे गटाचे आमदार (Shinde Faction Mla) आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री (Maharashtra cabinet Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) अजित पवार (Ajit Pawar) आणि आपचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांची उदाहरण देत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य […]

Mumbaitak
follow google news

शिंदे गटाचे आमदार (Shinde Faction Mla) आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री (Maharashtra cabinet Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) अजित पवार (Ajit Pawar) आणि आपचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांची उदाहरण देत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. (Gulabrao patil attacks on Uddhav thackeray)

हे वाचलं का?

जळगावमध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्या ताटात खाल्लं, त्या ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही. योग्य वेळी आपण उत्तर देऊ. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी आपण 33वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो होतो. जाताना आपण त्यांना (उद्धव ठाकरे) सांगून आलो होतो. आपण भगोडे नाही”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली.

Pune : विद्यार्थ्यांसमोरच शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना लावला फोन

“राजकारणात जे घडतं होतं, त्याबद्दल पक्ष नेतृत्वाला (उद्धव ठाकरे) आपण सूचना केली होती. त्याची मात्र दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती”, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांनी (अजित पवार) त्यांची चूक दुरुस्त केली होती. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते. त्यांनी (अरविंद केजरीवाल) लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते”, असे दाखले गुलाबराव पाटील यांनी दिले.

‘काँग्रेसची भूमिका न्यायाला धरून नाही’, सुधीर तांबेंनी मांडली भूमिका

“आमच्या बंडावेळीही ते शक्य होते, मात्र उद्धव ठाकरे यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती. कधी कधी खूप ग खूप नडतो आणि त्याचाच हा परिणाम आहे”, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

शरद पवार पॉप्युलर, नरेंद्र मोदी लोकप्रिय -गुलाबराव पाटील

“राजकारणात काम करताना तुम्ही कितीही चांगलं काम केलं, तरी तुम्हाला विरोधक असतातच. शरद पवार हे अत्यंत पॉप्युलर नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लोकप्रिय नेते आहेत, पण या दोन्ही नेत्यांनाही विरोधक आहेत. त्यामुळे विरोधक काय करतात आणि काय नाही, याचा अधिक विचार न करता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे”, असा सल्ला गुलाबराव पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

    follow whatsapp