Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा सण मराठी कॅलेंडरनुसार, पौष महिन्यात येतो. गेल्या वर्षभरात जे काही वाईट घडलं ते सर्व विसरून नवीन सुरूवात करण्याचा हा दिवस. नवीन सुरूवात करताना कधीही गोड खाऊन करावी म्हणून तिळगुळ दिले जातात. संक्रातीला नुसते तिळगुळच देत नाही तर, तिळाचे लाडू आणि शुभेच्छाही देतात. यावर्षीची संक्रांत खास आहे, सर्व विसरा आणि तिळगुळ घ्या गोड-गोड बोला.
ADVERTISEMENT
मकर संक्रातीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
नाते आपुले, हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दृढ करायचे…..
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा….
MLC Election : ‘मविआ’त गोंधळ! शिवसेनेनं काँग्रेसला स्पष्ट शब्दात सुनावलं
दु:ख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
सण गोडवा जपण्याचा, सण सनेहभाव वाढवण्याचा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचौतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कणभर तीळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड गोड बोला, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पण, मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात… अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ADVERTISEMENT
