मुंबईत आज ‘कोसळधार’, अनेक भाग जलमय; पुढील ३ तास पाऊस पडण्याचा IMD चा अंदाज

मुंबई तक

• 02:09 AM • 16 Jul 2021

मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चेंबूर, हिंदमाता, सायन, कुर्ला यासारख्या अनेक सखल भागांमध्ये या पावसामुळे पाणी साचलेलं पहायला मिळालं. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे काही तास विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड या तीन भागांमध्ये हवामान विभागाने पुढचे काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला […]

Mumbai Tak
Google CTA

मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चेंबूर, हिंदमाता, सायन, कुर्ला यासारख्या अनेक सखल भागांमध्ये या पावसामुळे पाणी साचलेलं पहायला मिळालं. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे काही तास विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचे संकेत आहेत.

हे वाचलं का?

अरबी समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड या तीन भागांमध्ये हवामान विभागाने पुढचे काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोकणातील काही भागांमध्ये पुढच्या ३ तासापर्यंत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असंही IMD ने म्हटलंय.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबापुरीत आज चांगलं पुनरागमन केलं. मुंबईतल्या सायन भागातील गांधी मार्केट परिसरात पाऊस आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सरकत होती. अनेकांची वाहनं या साचलेल्या पाण्यात बंद पडली.

दरम्यान, प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दादर हिंदमाता, एअरपोर्ट परिसरातही पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे कुर्ला परिसरातही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं पहायला मिळालं. बेस्ट बस, चारचाकी आणि दुचाकी गाडीस्वार याच पाण्यातून आपली वाहनं पुढे काढताना पहायला मिळाले.