मुंबई विमानतळावर ५६ कोटी किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने २६ फेब्रुवारीला केलेल्या एका कारवाईत अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. परदेशातून आलेल्या एका प्रवाशाची कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारावर चौकशी केली असता त्याच्याकडे ८ किलो हेरॉईन सापडून आलं आहे. मझीज असं या प्रवाशाचं नाव असून तो जोहान्सबर्गवरुन मुंबईत दाखल झाला होता. या प्रवाशाने हेरॉईन आपल्या बॅगेत छोट्या पिशव्यांमध्ये भरुन ठेवलं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:35 AM • 28 Feb 2022

follow google news

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने २६ फेब्रुवारीला केलेल्या एका कारवाईत अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. परदेशातून आलेल्या एका प्रवाशाची कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारावर चौकशी केली असता त्याच्याकडे ८ किलो हेरॉईन सापडून आलं आहे.

हे वाचलं का?

मझीज असं या प्रवाशाचं नाव असून तो जोहान्सबर्गवरुन मुंबईत दाखल झाला होता. या प्रवाशाने हेरॉईन आपल्या बॅगेत छोट्या पिशव्यांमध्ये भरुन ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत ५६ कोटींच्या घरात असल्याचं कळतंय. या प्रवाशाची चौकशी केली असता त्याला हे अमली पदार्थ जोहान्सबर्ग विमानतळावर एका व्यक्तीने दिल्याचं कस्टम विभागाला समजलं आहे.

कस्टम विभागाने या परदेशी व्यक्तीला अटक केली असून हे अमली पदार्थ तो मुंबईत कोणाला विकण्यासाठी आला होता याची चौकशी सुरु आहे.

    follow whatsapp