शिवसेनेचे मंत्री उदय सामंत म्हणतात, ‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री’

मुंबई तक

• 12:08 PM • 12 Feb 2021

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकील संघर्ष हा सर्वश्रूतच आहे. मात्र, असं असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, ‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. राज्यपाल कुलपती असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मला राज्यपालांकडे बऱ्याचदा जावं लागतं. त्यामुळे राज्यपाल […]

Mumbaitak
follow google news

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकील संघर्ष हा सर्वश्रूतच आहे. मात्र, असं असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, ‘मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. राज्यपाल कुलपती असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मला राज्यपालांकडे बऱ्याचदा जावं लागतं. त्यामुळे राज्यपाल आणि माझे चांगले संबंध आहेत आणि मी त्यांचा लाडका मंत्री आहे. असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

मंत्री उदय सामंत हे आज (12 फेब्रुवारी) सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

‘माझे राज्यपालांशी चांगले संबंध’

‘राज्यपालांशी मी कायम संपर्कात असतो. राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला कोणतीही अडचण येत नाही. परवा देखील मी राज्यपाल महोदयांशी चर्चा करुन आलो. यावेळी अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. राजकीय जे काही कार्यक्रम होतायेत किंवा राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत या वेगळ्या आहेत. परंतु हे खातं चालवत असताना मला राज्यपाल महोदयांकडे जावं लागत असतं. त्यांना भेटावं लागतं. मला असं वाटतं की, जर आपण वर्षभराचा एकंदरित आलेख पाहिला असेल तर माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत हेच आपल्याला दिसून येईल.’ असं मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

ही बातमी नक्की पाहा: ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?

ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील शीतयुद्ध

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये एक प्रकारे शीतयुद्ध सुरु आहे. अनेक दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधान परिषदेच्या आमदारांच्या शिफारसीचा प्रस्ताव राज्यपालांना दिलेला आहे. मात्र अद्यापही राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारमधील अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीका सुरु केली आहे. त्यातच काल (11 फेब्रुवारी) ठाकरे सरकारकडून राज्यपालांना शासकीय विमानातून प्रवास नाकारण्यात आला. ज्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद समोर आले.

हे पण वाचा: राज्यपालांच्या विमान प्रवास वादावर CM ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य खूप महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp