मी कंगनाला ओळखत नाही, पण ती जे म्हटली ते योग्यच! मी पुरावे देणार : विक्रम गोखले

मुंबई तक

• 02:34 PM • 18 Nov 2021

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना कुणी नावं ठेवतं आहे कुणी त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणतं आहे. अर्थात मराठी कलाकारांनी त्यांच्याबाबत कुठलीही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केल्याने त्यांच्यावर टीका होते आहे. विक्रम गोखले यांनी […]

Mumbaitak
follow google news

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना कुणी नावं ठेवतं आहे कुणी त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणतं आहे. अर्थात मराठी कलाकारांनी त्यांच्याबाबत कुठलीही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केल्याने त्यांच्यावर टीका होते आहे. विक्रम गोखले यांनी हिंदी सिनेसृष्टीतही बरंच काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले जात आहेत. अशात आता कंगनाला मी ओळखत नाही असं विक्रम गोखले म्हटले आहेत.

हे वाचलं का?

विक्रम गोखले हे विचारवंत आहेत, विचार करूनच बोलले असतील-अवधूत गुप्ते

विक्रम गोखले यांनी NEWJ या वेब पोर्टलला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात ‘मी कंगना रणौतला ओळखत नाही. तिच्यासोबत कधीही काम केलेलं नाही. माझं भाषण त्यादिवशी कुणी ऐकलं का? आज कुठेतरी काहीतरी लिहून आलं आहे. जे काही लिहून आलं त्याचं उत्तर मी 19 तारखेला देणार आहे. मी जेव्हा बोलेन तेव्हा कुणीही मला प्रश्न विचारू शकणार नाही. मी जे काही बोलणार आहे ते पुराव्यांच्यासहीत बोलणार आहे. कंगना जे बोलली ते योग्यच आहे. ते कसं योग्य आहे ते मी पुरावे देऊन सिद्ध करणार आहे. मला आजही आई बहिणीवरून शिव्या दिल्या जात आहेत. मी सगळं सहन करतो आहे. मी अनेक आघाड्यांवर लढतो आहे’

असं आता विक्रम गोखले या मुलाखतीत म्हणाले आहेत. NEWJ या वेब पोर्टलने विक्रम गोखलेंच्या मुलाखतीचा काही अंश ट्विट केला आहे.

काय आहे प्रकरण?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला’, या अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ‘कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत आहे’, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.

नेमकं काय म्हणाले होते विक्रम गोखले?

कंगना रणौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही.”

“आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहत आहेत. हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही. असेही काही लोक आपल्या केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे”, अशी भूमिका मांडत विक्रम गोखले यांनी कंगना रणौतच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

    follow whatsapp