एवढा इगो असलेलं सरकार मी आजवर कधीही पाहिलं नाही: फडणवीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. ‘राज्यपाल पोचल्यानंतर त्यांना विमानात बसू न देणं किंवा विमानातून उतरवणं हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय. राज्यपाल ही काही व्यक्ती नाही. एक व्यक्ती येते एक व्यक्ती जाते. पण महाराष्ट्राच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:54 PM • 11 Feb 2021

follow google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. ‘राज्यपाल पोचल्यानंतर त्यांना विमानात बसू न देणं किंवा विमानातून उतरवणं हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय. राज्यपाल ही काही व्यक्ती नाही. एक व्यक्ती येते एक व्यक्ती जाते. पण महाराष्ट्राच्या इतिहासात इतका इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर शरसंधान साधलं.

हे वाचलं का?

पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

‘हा सगळा प्रकार जो काही घडला तो दुर्देवी आहे. ही कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीए. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर आपल्यात एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यांना जीएडीला पत्र द्यावं लागतं आणि जीएडी त्या संदर्भात आदेश काढतं. मी याबाबत माहिती घेतली तेव्हा मला समजलं की, कालच जीएडीला सविस्तर असं पत्र देण्यात आलं होतं. सगळी फाइल तयार झाली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंत ती गेली होती. असं असताना राज्यपाल पोचल्यानंतर त्यांना विमानात बसू न देणं किंवा विमानातून उतरवणं हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय. राज्यपाल ही काही व्यक्ती नाही. एक व्यक्ती येते एक व्यक्ती जाते. पण महाराष्ट्राच्या इतिहासात इतका इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. इतका प्रचंड इगो कशाचा आहे? कशाकरता हे चाललेलं आहे? हा सगळा पोरखेळ चालला आहे. अतिशय चुकीचं आहे निषेधार्य आहे.’ अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज (11 फेब्रुवारी) सकाळी देहरादून येथील लाल बहादूर अॅकेडमी येथील कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यासाठी ते विमानात देखील बसले. मात्र, त्याचवेळी त्यांना सांगण्यात आलं की, हा विमानाला उड्डाणासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यपालांना त्या विमानातून पुन्हा खाली उतरावं लागलं. त्यानंतर राज्यपालांनी व्यावसायिक विमानातून प्रवास करणं पसंत केलं.

या सगळ्या प्रकारानंतर आता राज्य सरकारवर भाजपच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

    follow whatsapp