हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई तक

• 09:55 AM • 21 Nov 2021

हिंमत असेल तर रझा अकदामीवर बंदी घालून दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. अमरावतीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यावर वातावरण त्यावर वातावरण तापवलं गेलं. तिथल्या पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आणखी काय म्हणाले फडणवीस? काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी […]

Mumbaitak
follow google news

हिंमत असेल तर रझा अकदामीवर बंदी घालून दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. अमरावतीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यावर वातावरण त्यावर वातावरण तापवलं गेलं. तिथल्या पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले फडणवीस?

काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते? मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती. तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे आणि कुणाचं पिल्लू आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटतं ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. आहे का हिंमत? काँग्रेसमध्ये आहे का हिंमत? असा सवाल फडणवीसांनी केला.

12 नोव्हेंबरची घटना डिलिट करून 13 तारखेच्या घटनेत जे लोक सहभागी झाले तेवढंच पाहिलं जातं आहे. जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे.राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. त्यामुळे या कारवाईचा आम्हाला निषेधही करावा लागेल. जर अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

12 नोव्हेंबरच्या अमरावती हिंसाचाराबाबत राज्य सरकारने मौन का बाळगलं आहे?-फडणवीस

समाजात एक नेरेटिव्ह तयार करण्याकरिता समाजाला भडकवण्यता आलं. जी घटना घडलीच नाही त्याच्यासाठी मोर्चे काढण्यात आले. एवढे मोठे मोर्चे राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात हे आता ठरवलं आणि निघाले असं होत नाही. हे सुनियोजित मोर्चे होते. एकाच वेळी एकाच दिवशी हे मोर्चे निघाले. त्यावरून हा सुनियोजित कट होता हे दिसून येते. त्यामुळे फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कोणी काढले? त्याची चौकशी करा. त्यांची या मागची भूमिका काय होती हे सत्य समोर येऊ द्या, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो कुणाच्या परवानगीने निघाला? किती लोकांना संमती दिली होती? का परवानगी देण्यात आली होती? हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे. सरकारने ते सांगितलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा मोर्चा परतत असताना जे काही घडलं ते दंगे, हिंसाचार घडावा या उद्देशाने केलं गेलं. विशिष्ट धर्माच्या लोकांची दुकानं फोडण्यात आली. आता राज्यकर्ते 12 तारखेची घटना पुसून टाकण्याचा प्रयत्न करून 13 तारखेला जे घडलं तेच सांगत आहेत. 13 तारखेला घडलेली घटना ही देखील चुकीचीच होती. आम्ही हिंसाचाराचं समर्थन करत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp