मराठा आरक्षणावर भूमिका मांडा,सुप्रीम कोर्टाची सर्व राज्यांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावरची सुनावणी संपली आहे. ५० टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकत का या प्रश्नावर सर्व राज्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं. त्यामुळे या प्रकरणात सर्व राज्यांना नोटीस पाठवून आपली भूमिका मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातली पुढची सुनावणी १५ मार्चला होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भुषण, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:56 AM • 08 Mar 2021

follow google news

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावरची सुनावणी संपली आहे. ५० टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकत का या प्रश्नावर सर्व राज्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं. त्यामुळे या प्रकरणात सर्व राज्यांना नोटीस पाठवून आपली भूमिका मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातली पुढची सुनावणी १५ मार्चला होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भुषण, नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी झाली.

हे वाचलं का?

महाराष्ट्र सरकारने ५० टक्के आरक्षणाचा उल्लंघनाचा प्रश्न असल्यामुळे हे प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवावं अशी मागणी केली होती. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा सहानी प्रकरणाचे निकष मराठा आरक्षणासाठी लावले जाऊ शकतात का याची तपासणी करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान याप्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीचा पेचही सर्वोच्च न्यायालयाला सोडवावा लागणार आहे.

राज्य सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी आणि कपिल सिब्बल यांनी मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादीत नसून इतर राज्यांनाही पक्षकार करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून आता सर्व राज्यांना तामिळनाडूतील आरक्षण, EWS आरक्षण यासंदर्भातही भूमिका मांडावी लागणार आहे.

    follow whatsapp