Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?

मुंबई तक

08 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:52 PM)

कोहिमा : सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असताना आणि स्वतःकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी असताना देखील राष्ट्रवादीने सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने (NCP) अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. नागालँडमध्ये घेतलेल्या भूमिकेचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा इरादा आहे का? […]

Mumbaitak
follow google news

कोहिमा : सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असताना आणि स्वतःकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी असताना देखील राष्ट्रवादीने सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने (NCP) अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. नागालँडमध्ये घेतलेल्या भूमिकेचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा इरादा आहे का? महाविकास आघाडी फुटणार का? असे काही सवाल विचारले जात आहेत. (In Nagaland, the NCP has decided to support the ruling NDPP-BJP alliance instead of opposing it.)

हे वाचलं का?

याबद्दलच ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा का दिला?

प्रादेशिक स्तरावर बरीच समीकरण असतात. आमच्या निवडून आलेल्या सात आमदारांशी माझी चर्चा झाली. यात ईशान्येतील राज्यांपैकी नागालँड सर्वात पिछाडीवरील राज्य आहे. नागालँडमध्ये बरेच प्रश्न आहेत. या सगळ्या आमदारांनी थेट भाजपच्या उमेदवरांचा पराभव केला आहे. आमचा ज्या पाच ठिकाणी पराभव झालेला आहे तिथही विरोधात भाजपच होता. पण त्यानंतरही आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्ही नागालँडच्या विकासाच्या भूमिकेतून घेतला आहे. यामागे काही स्थानिक समीकरण असतात. आमदारांची विकास काम असतात आणि आम्ही एनडीपीपी यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत.

Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?

पक्ष वाचविण्यासाठी निर्णय घेतला आहे का?

प्रादेशिक पक्ष किंवा कमी आमदार असणाऱ्या पक्षांचे आमदार फोडण्याच्या भीतीने हा निर्णय घेतला आहे का? याबाबत बोलताना वर्मा म्हणाले, जेव्हा मी पहिल्या विधिमंडळ बैठकीला हजर होतो तेव्हा प्रत्येक आमदाराने त्यांची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही गोष्ट मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडली. त्यानंतर नागालँडच्या विकासासाठीच हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आमदाराची विकासाची काम व्हावी ही इच्छा होती. आमच्या सातही आमदारांचे रियो यांच्याशी संबंध आहेत.

Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story

याची महाराष्ट्राशी तुलना होऊ शकते का?

या आघाडीचे महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम होऊ शकतात का? याबाबत वर्मा म्हणाले, आम्ही महाराष्ट्राची तुलना नागालँडशी करुच शकत नाहीत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद मोठी आहे. आमदार सक्षम आहेत. आपले मतदारसंघ त्यांनी स्वतःचे गड बनविले आहेत. मतदारसंघात विकासकामं झाली आहेत. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे नेतृत्व सक्षम आहे. कोणताही प्रश्न उद्भवला तरी ते सक्षमपणे हाताळत आहेत. पण नागालँडची परिस्थिती वेगळी आहे.

राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा :

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यात एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. त्यामुळे साठ सदस्यीय विधानसभेत ३७ जागांसह सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र त्यानंतर देखील विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नागालँडमध्ये आता विरोधी पक्षच अस्तित्वात नसणार आहे.

    follow whatsapp