शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाचा आणखी एक नवा अंक राज्यात पहायला मिळाला आहे. शिवसेना नेतृत्वाच्या जवळचे मानले जाणारे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने कारवाई करत त्यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. आयकर विभागाने जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये Bilakhadi Chambers […]

mumbaitak

mumbaitak

दिव्येश सिंह

• 05:03 PM • 07 Apr 2022

follow google news

केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाचा आणखी एक नवा अंक राज्यात पहायला मिळाला आहे. शिवसेना नेतृत्वाच्या जवळचे मानले जाणारे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने कारवाई करत त्यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

हे वाचलं का?

आयकर विभागाने जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये Bilakhadi Chambers बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील Imperial Crown हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर धाडी टाकत तपासाला सुरुवात केली होती. या तपासात यशवंत जाधव यांच्या परिवाराला बोगस कंपन्यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळाल्याचं आयकर विभागाला समजलं होतं. या पैशांच्या माध्यमातून जाधव परिवाराने मनी लाँड्रींग केल्याचं आयकर विभागाचं म्हणणं असून यासंदर्भातले काही पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत.

याचसोबत आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा विलास मोहीते आणि पुतण्या विनीत जाधव यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतू हे दोघंही चौकशीसाठी हजर राहीले नाहीत.

यशवंत जाधवांच्या अडचणी वाढणार, एका तक्रारीमुळे जाधव ED च्या रडारवर येण्याची शक्यता

स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचं समजलं. यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहीते यांच्या नावावर भायखळा परिसरात Imperial Crown नावाचं एक हॉटेलही खरेदी केल्याचं समोर आलं.

    follow whatsapp