नवाब मलिकांनी आरोप केलेल्या अमृता फडणवीसांच्या गाण्याच्या श्रेयनामावलीतून जयदीप राणाचं नाव गायब?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी जे गाणं केलं होतं त्यावर आक्षेप घेतले. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:15 AM • 01 Nov 2021

follow google news

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी जे गाणं केलं होतं त्यावर आक्षेप घेतले. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला.

हे वाचलं का?

यूट्यूबवर या गाण्याचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओखाली असलेल्या श्रेयनामावलीचा एक फोटो नवाब मलिक यांनी ट्वीटरवर ट्वीट केला ज्यात स्पष्टपणे या व्हिडिओचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे असं दिसत आहे.पण आता जर आपण यूट्यूबवर गेलात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत झालेला मुंबई रिव्हर अँथम हा व्हिडिओ पाहिला असता. या व्हिडिओच्या खाली दिलेल्या श्रेयनामावलीत जयदीप राणाचं नाव आपल्याला दिसतच नाही.त्यामुळे आता प्रश्न हा पडतो की नवाब मलिकांनी ट्वीट केलेल्या फोटोमधील जयदीप राणाचं असलेलं नाव आणि यूट्यूबवरच्या आत्ता असलेल्या व्हिडिओत जयदीप राणाचं नसलेलं नाव याबद्दल बराच संभ्रम आपल्याला दिसून येतो.

    follow whatsapp