JioPhone Next: कसा बुक कराल हा फोन, EMI स्कीम आणि डेटा प्लॅन, जाणून घ्या सर्वकाही एकाच ठिकाणी

मुंबई तक

• 11:47 AM • 06 Nov 2021

मुंबई: JioPhone Next हा आता आपल्याला खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे बनवला आहे. त्याची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. पण, तुम्ही अवघ्या 1,999 रुपये भरून तो EMI वर देखील खरेदी करू शकता. EMI सह मंथली प्लॅन्सचा देखील यात समावेश आहे. तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार ईएमआय प्लॅन निवडू शकता. आता सगळ्यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: JioPhone Next हा आता आपल्याला खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे बनवला आहे. त्याची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. पण, तुम्ही अवघ्या 1,999 रुपये भरून तो EMI वर देखील खरेदी करू शकता.

हे वाचलं का?

EMI सह मंथली प्लॅन्सचा देखील यात समावेश आहे. तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार ईएमआय प्लॅन निवडू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओचा हा स्मार्टफोन तुम्ही कसा बुक कराल आणि तो नेमका मिळवाल कसा.

रिलायन्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही JioPhone Next बुक करू शकता. यासाठी तुम्हाला वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून JioPhone Next देखील बुक करू शकता.

WhatsApp द्वारे JioPhone बुक करण्यासाठी तुम्ही 7018270182 वर Hi टाइप करून WhatsApp करू शकता. हा JioMart Digital चा नंबर आहे. नोंदणी केल्यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल. यानंतर तुम्ही रिलायन्स स्टोअर किंवा घराच्या पत्ता देऊन फोन खरेदी करू शकता.

JioPhone Next मध्ये अनेक अटी आहेत. फोन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही या अटी काळजीपूर्वक वाचा. तुम्ही 1,999 रुपये देऊन 18 किंवा 24 महिन्यांसाठी EMI सेट करू शकता. तुम्ही 300 ते 600 रुपये मासिक EMI सेट करू शकता.

प्रोसेसिंग फी म्हणून आपल्या 501 रुपये भरावे लागतील. 300 रुपयांचा बेसिक प्लॅन आहे, ज्यामध्ये फक्त 5GB डेटा आणि महिनाभर 100 मिनिटं कॉलिंगसाठी उपलब्ध असतील. जर तुम्ही सतत कॉलिंग करत असाल आणि डेटा वापरत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी योग्य नाही.

XXL प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तो 550 रुपयांचा आहे. या अंतर्गत तुम्हाला दररोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. याशिवाय, इतरही काही प्लॅन्स आहेत ज्या तुम्ही पाहू शकता.

JioPhone Next बद्दल बोलायचे झाले तर, यात 5.45 इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो HD Plus आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम 215 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे.

JioPhone Next मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत LED फ्लॅश देखील आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

JioPhone Next मध्ये Android 11 आधारित Pragati OS देण्यात आला आहे. Jio कडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे प्रगती OS ही Android चं ऑप्टिमाइझ व्हर्जन आहे. जे खास JioPhone Next साठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये 10 भारतीय भाषांसाठी सपोर्ट मिळणार आहे.

आज लॉन्च होणार Jio Phone Next : जाणून घ्या या 4G फोनच्या किंमत, फिचर्ससह सर्व काही

या स्मार्टफोनची बॅटरी 3,500mAh आहे आणि सोबत मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. Jio Phone Next मध्ये 32GB इंटर्नल स्टोरेज असून, मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट सुविधाही आहे. त्याच्या मदतीने जिओ फोन नेक्स्ट वापरकर्त्याला मेमरी 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.

Jio Phone Next मध्ये Google कॅमेरा F देण्यात आला आहे, जो HDR ला देखील सपोर्ट करतो. याशिवाय नाईट मोड आणि सॉफ्टवेअर बेस्ड पोर्ट्रेट मोडलाही सपोर्ट करते.

    follow whatsapp