नवजात बाळाला लोकल ट्रेनमध्ये सोडून देणाऱ्या महिलेसह प्रियकराला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. २० नोव्हेंबरला टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ सापडलं होतं. कल्याण रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत होतं.
ADVERTISEMENT
सीसीटीव्ही तपासत असताना कोपर रेल्वे स्थानकात एक महिला हातात पिशवी घेऊन बसल्याचं पोलिसांना दिसलं. ही महिला गाडीत चढून पुढे गेली. त्यावेळी तिच्या हातात असलेली पिशवी आणि ज्या ठिकाणी बाळ सापडलं ती पिशवी सारखीच असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. या शक्यतेच्या आधारावर पोलिसांनी तपास करुन महिलेचा पत्ता शोधला.
कल्याण: चुकीच्या उपचारामुळे दीड वर्षीय चिमुकली दगावली, कोर्टाच्या आदेशानंतर डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या महिलेचे एका विवाहीत पुरुषाशी अनैतिक संबंध होते. या संबंधातून हे बाळ जन्माला आल्याचं समोर आलं. जन्मानंतर हे बाळ नकोसं झाल्यामुळेच या महिलेने बाळाला लोकलमध्ये सोडून देण्याचं ठरवलं. या कामात तिच्या प्रियकरानेही तिला साथ दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गावाने वेडं ठरवलं, परंतू त्याच्याच माहितीने पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हत्येतील आरोपीला केली अटक
ADVERTISEMENT
