अर्जात दुरुस्ती केल्यानंतर कंगनाच्या Passport Renewal ची प्रक्रीया लगेच होईल – पासपोर्ट कार्यालयाची माहिती

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या पासपोर्ट रिन्युअल प्रक्रियेबद्दल स्थानिक पासपोर्ट कार्यालयाने मुंबई हायकोर्टात महत्वाची माहिती दिली आहे. कंगनाने आपल्या अर्जामधील काही चुका दुरुस्त केल्या की तिचा पासपोर्ट रिन्यु करण्याबद्दलची प्रक्रिया नियमानुसार वेगवान पद्धतीने केली जाईल असं पासपोर्ट कार्यालयाने सांगितलं. मुंबई पासपोर्ट विभागातर्फे Additional Solicitor General अनिल सिंग यांनी हायकोर्टात बाजू मांडली. कंगनाच्या अर्जात काही चुका असल्याचं […]

Mumbai Tak

विद्या

• 02:35 AM • 29 Jun 2021

follow google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या पासपोर्ट रिन्युअल प्रक्रियेबद्दल स्थानिक पासपोर्ट कार्यालयाने मुंबई हायकोर्टात महत्वाची माहिती दिली आहे. कंगनाने आपल्या अर्जामधील काही चुका दुरुस्त केल्या की तिचा पासपोर्ट रिन्यु करण्याबद्दलची प्रक्रिया नियमानुसार वेगवान पद्धतीने केली जाईल असं पासपोर्ट कार्यालयाने सांगितलं.

हे वाचलं का?

मुंबई पासपोर्ट विभागातर्फे Additional Solicitor General अनिल सिंग यांनी हायकोर्टात बाजू मांडली. कंगनाच्या अर्जात काही चुका असल्याचं अनिल सिंग यांनी कोर्टात सांगितलं. कंगनाने आपल्या अर्जात आपल्याविरुद्ध Criminal Cases प्रलंबित असल्याचं म्हटलंय. परंतू प्रत्यक्षात या प्रकरणांमध्ये कंगनाविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून यासंदर्भातली Criminal Proceddings अद्याप सुरु व्हायची आहे.

जर कंगनाच्या वकीलांनी तिच्याविरुद्द कोणतीही Criminal Case पेंडींग नसल्याचं सिद्ध केलं आणि कंगनाने आपल्या अर्जात आवश्यक ती दुरुस्ती केली तर पासपोर्ट कार्यालय नियमाप्रमाणे तिचा पासपोर्ट रिन्यू करण्याची प्रक्रीयेला सुरुवात करेल. ट्विटरवरुन दोन समाजांमध्ये तेढ पसरवल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याव्यतिरीक्त आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं सांगत कंगना रणौतने पासपोर्ट रिन्युअलसाठी हायकोर्टात धाव घेतली होती. प्रत्यक्षात कंगना रणौतविरुद्ध खार पोलीस ठाण्यात Copyright Violation प्रकरणात एक FIR दाखल करण्यात आलेली आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये कंगनाच्या पासपोर्टची वैधता संपते आहे. आपल्या आगामी चित्रपटासाठी कंगनाला हंगेरी येथील बुडापेस्टला जायचं आहे. परंतू पासपोर्ट ऑफिसमधील अधिकारी आपला पासपोर्ट रिन्युअल प्रोसिजरमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप करत कंगनाने हायकोर्टात धाव घेतली होती.

    follow whatsapp