‘…अन् बाप्पा माझ्यासमोर हसले; किरीट सोमय्यांनी Lalbaugcha Raja कडे काय मागितलं?

मुंबई तक

• 10:08 AM • 03 Sep 2022

शिवसेना नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते अनिल परब यांना लक्ष्य केलं. यावेळी किरीट सोमय्यांनी एक विधान केले, ज्याची सध्या चर्चा होतेय. उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते अनिल परब यांना लक्ष्य केलं. यावेळी किरीट सोमय्यांनी एक विधान केले, ज्याची सध्या चर्चा होतेय.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.

काँग्रेसचा किरीट सोमय्यांना चिमटा

गणपती माझ्याकडे बघून हसल्याच्या विधानावरून काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. “ज्याच्याकडे पाहून बाप्पा लाही हसू येईल तो केवढा मोठा जोकर असेल?”, असं म्हणत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांना उपहासात्मक टोला लगावला आहे.

Lalbaugcha Raja च्या दर्शनानंतर किरीट सोमय्या अनिल परबांबद्दल काय म्हणाले?

लालबागचा राजाकडे काय प्रार्थना केली? या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले, “मी बाप्पांना सांगितलं की, जो महाराष्ट्राचा कलंक आहे, ट्विन टॉवर्स नोएडात पडले. महाराष्ट्रातील घोटाळ्याचं प्रतिक असलेलं अनिल परबांचं ट्विन रिसॉर्ट पाडण्याची मला शक्ती दे, अशी विनंती केली.”

‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’; एकनाथ शिंदेंच्या समोर नारायण राणे काय म्हणाले?

मुंबईकरांसाठी काय साकडं घातलं? असा प्रश्न यावेळी किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला. त्यावर सोमय्या म्हणाले, “मुंबई महापालिकेतील माफियाराज संपवण्यासाठी प्रार्थना केली आणि गणपती माझ्यासमोर हसले”, असं किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

अनिल परब किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांकडून रिसॉर्ट प्रकरणी आरोप केले जात आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर किरीट सोमय्यांनी एक ट्विट केलं होतं.

“रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अनिल परबांच्या अनधिकृत ट्वीन रिसॉर्टना तोडण्याचा आराखडा जाहीर केला. सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर व पाडण्याचा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणार. मला विश्वास आहे की येत्या दीपावली पर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त झालेले असणार”, असं किरीट सोमय्यांनी ट्विट मध्ये म्हटलं होतं.

Anil Parab यांचं दापोली रिसॉर्ट प्रकरण नेमकं काय आहे? काय आहे आरोप?

सोमय्यांनी उपस्थित केला मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा

नोएडातील ट्विन टॉवर्स प्रकरणाचा संदर्भत देत किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

“मुंबईत २५ हजारहून अधिक भाडेकरू, घरमालक हे घरांना ओसी प्रमाणपत्र नसल्यानं चिंतेत आहेत. अनेक टॉवर्सलादेखील ओसी प्रमाणपत्र नाही. काही मजले बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी २५ हजारांहून अधिक सदनिकाधारकांना न्याय मिळाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे.

    follow whatsapp