कोल्हापूर : जीवलग मित्राने केला घात, सराफ मित्राच्या दुकानातून चोरलं 56 तोळे सोनं

मुंबई तक

13 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

कोल्हापूरच्या टाकाळा परिसरात रणजीत पारेख या सराफ व्यवसायिकाच्या दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शाहुपूरी पोलिसांना यश आलं आहे. रणजीत यांचा जवळचा मित्र असलेल्या प्रशांत पाटीलनेच ही चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. प्रशांत पाटीलने आपल्याच मित्राच्या दुकानातून 56 तोळे सोनं चोरलं. पोलिसांनी यापैकी 44 तोळे सोनं हस्तगत करुन आरोपीला अटक केली आहे. कोल्हापूर : पोलीस […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूरच्या टाकाळा परिसरात रणजीत पारेख या सराफ व्यवसायिकाच्या दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शाहुपूरी पोलिसांना यश आलं आहे. रणजीत यांचा जवळचा मित्र असलेल्या प्रशांत पाटीलनेच ही चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

हे वाचलं का?

प्रशांत पाटीलने आपल्याच मित्राच्या दुकानातून 56 तोळे सोनं चोरलं. पोलिसांनी यापैकी 44 तोळे सोनं हस्तगत करुन आरोपीला अटक केली आहे.

कोल्हापूर : पोलीस असल्याची बतावणी करुन लुबाडणाऱ्या इराणी टोळीतील भामट्याला अटक

टाकाळा परिसरात रणजीत एंटरप्राइजेस या सराफा दुकानात दोन दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. 56 तोळे सोनं चोरीला गेल्यामुळे शाहुपूरी पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान होतं. चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही चोरुन नेल्यामुळे हा तपास पोलिसांसाठी अधिकच जिकरीचा होऊन बसला होता.

Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित

यानंतर पोलिसांनी या भागातील इतर दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. या चौकशीदरम्यान एक व्यक्ती रणजीत यांच्या दुकानासमोर संशयास्पदरित्या घुटमळताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवली असता तो रणजीत यांचा मित्र प्रशांत पाटील निघाला. चौकशीसाठी प्रशांत पाटीलला ताब्यात घेतल्यानंतर प्रशांतने आपला गुन्हा कबुल केला.

रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची 27 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

रणजीत आणि प्रशांत हे जवळचे मित्र आहेत. प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात ते नेहमी एकमेकांच्या सोबत असायचे. परंतू झटपट श्रीमंत होण्याची इच्छा असल्यामुळे आपण मित्राच्या दुकानात चोरी केल्याचं प्रशांतने कबुल केलं. या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पोलीस पथकाला अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 15 हजाराचं बक्षीस जाहीर केलं आहे.

    follow whatsapp