वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाला कोल्हापूरच्या नेसरी गावकऱ्यांचा विरोध

महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. या चित्रपटांमध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या सोबत नेसरी खिंडीत झालेला रणसंग्राम चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच इतिहासाची मोडतोड करून सरदारांची नावे चुकवण्यात आली आहेत. इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नेसरी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी शेकडो गावकऱ्यांनी एकत्र येत आज […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:16 AM • 08 Nov 2022

follow google news

महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. या चित्रपटांमध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या सोबत नेसरी खिंडीत झालेला रणसंग्राम चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच इतिहासाची मोडतोड करून सरदारांची नावे चुकवण्यात आली आहेत. इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नेसरी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी शेकडो गावकऱ्यांनी एकत्र येत आज महेश मांजरेकर यांच्या निषेध व्यक्त केला आहे. महेश मांजरेकर यांच्या फोटोला चपलांनी बडवण्यात आलं आहे. तसेच त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देत त्यांचे कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

हरहर महादेव नंतर आता वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमावरून वाद

हर हर महादेव या सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यानंतर आता वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमालाही विरोध होतो आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन या सिनेमाला विरोध केला होता. तसंच आता कोल्हापूरच्या नेसरी गावातील गावकऱ्यांनीही यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.

वेडात मराठे वीर दौडले सिनेमात अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवराय

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या मुहूर्तासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आले होते. तसंच या सिनेमातल्या सात पात्रांचा परिचयही या वेळी करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे या सिनेमात अक्षय कुमार हा अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे तर प्रवीण तरडे हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नेसरीतल्या गावकऱ्यांनी काय मागणी केली?

चित्रपटांमध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या सोबत नेसरी खिंडीत झालेला रणसंग्राम चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच इतिहासाची मोडतोड करून सरदारांची नावे चुकवण्यात आली आहेत. इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नेसरी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी शेकडो गावकऱ्यांनी एकत्र येत आज महेश मांजरेकर यांच्या निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच वाद निर्माण झाला आहे. महेश मांजरेकर याबाबत काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp