EKnath Shinde : “भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…”

ठाण्यात शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी भारत पाकिस्तान मॅचचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली. तसंच दिवाळीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छाही दिल्या. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? भारत पाकिस्तान मॅचसारखीच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो. दिवाळीसोबत काल […]

Mumbai Tak

मुंबई तक

24 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

follow google news

ठाण्यात शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी भारत पाकिस्तान मॅचचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली. तसंच दिवाळीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छाही दिल्या.

हे वाचलं का?

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

भारत पाकिस्तान मॅचसारखीच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो. दिवाळीसोबत काल भारताने पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकला, त्याचा आनंद आपण आज साजरा केला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल. मेलबर्नच्या मैदानातही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बोर्ड झळकला होता. कालचा सामना भारताने जसा जिंकला. तसाच सामना आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलो. आमचा सामना महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच आधी आपली परंपरा, संस्कृती, सण उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

विकासासोबत या गोष्टीही आवश्यक आहेत. माणसाचं मन प्रसन्न असेल तर त्याला पुढे जाता येतं. या राज्यात आता परिवर्तनाचं पर्व सुरू झालं आहे. आज मी ज्या ठिकाणी जातो तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. या गोष्टीचं आम्हाला समाधान आणि आनंदही वाटतो त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp