ही तर जाहीर खिल्ली ! बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा अमोल मिटकरींना घरचा आहेर

मुंबई तक

• 02:02 PM • 21 Apr 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील कार्यक्रमात बोलत असताना ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. पुणे आणि राज्याच्या इतर भागांमध्ये ब्राम्हण आणि हिंदू संघटनांनी मिटकरींविरोधात जाहीर निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात सावध भूमिका घेत मिटकरींनी केलेलं विधान हे पक्षाची भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. परंतू बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील कार्यक्रमात बोलत असताना ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. पुणे आणि राज्याच्या इतर भागांमध्ये ब्राम्हण आणि हिंदू संघटनांनी मिटकरींविरोधात जाहीर निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात सावध भूमिका घेत मिटकरींनी केलेलं विधान हे पक्षाची भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

परंतू बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने अमोल मिटकरी यांना जाहीरपणे घरचा आहेर देत, मिटकरी यांनी केलेलं विधान ही जाहीरपणे खिल्ली असल्याचं म्हटलंय.

बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी फेसबूक पोस्ट लिहीत, मिटकरी यांनी केलेलं विधान ही जाहीर खिल्ली असल्याचं म्हटलं आहे. हिंदु धर्मात मम भार्या समर्पयामी असा मंत्र नसतो, मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेलं हे तंत्र असू शकतं असं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी हिन्दू समाजाच्या चालीरीती, मंत्रोच्चार याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

“मी एका ठिकाणी गेलो होतो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना.. नवरदेव पीएचडी, नवरी एम ए झालेली. लग्न लावणारे महाराज सांगत होते मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं अरे येड्या ते महाराज म्हणत आहेत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको समर्पयामी म्हणजे घेऊन जा.. आरारारा… कधी सुधारणार? ” असं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. त्यावरून खूप वाद निर्माण झाला आहे.

    follow whatsapp