महाबळेश्वर: माजी नगरसेवकाकडून सरकारी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

मुंबई तक

01 Jun 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

महाबळेश्वर: महाबळेश्वर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय पिसाळ यांनी महाबळेश्वर भूमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातीत कर्मचारी रविंद्र फाळके यांना जागेच्या मोजणी कामी चुकीच्या हद्दी दाखवून काम करत असल्याचा आरोप करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाणीमुळे जखमी भूमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयाचे कर्मचारी वाई येथील साई गणेश हॅास्पीटल येथे अतिदक्षता विभागात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. […]

Mumbaitak
follow google news

महाबळेश्वर: महाबळेश्वर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय पिसाळ यांनी महाबळेश्वर भूमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातीत कर्मचारी रविंद्र फाळके यांना जागेच्या मोजणी कामी चुकीच्या हद्दी दाखवून काम करत असल्याचा आरोप करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे वाचलं का?

बेदम मारहाणीमुळे जखमी भूमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयाचे कर्मचारी वाई येथील साई गणेश हॅास्पीटल येथे अतिदक्षता विभागात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

रविंद्र फाळके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन महाबळेश्वर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक संजय पिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होऊनही अद्याप माजी नगरसेवक संजय पिसाळ यांना अटक न करण्यात आल्यामुळे उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामबंद आदोलन सुरु केले आहे.

एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण : माजी खासदार रविंद्र गायकवाडांना दिलासा

पुण्यातील वारजे भागात तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या कर्वेनगर भागातील शाहू कॉलनी येथे एका तरुणी आणि तिच्या आईने शेजाऱ्यासोबत झालेल्या वादातून गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मायलेकींना पोलीस ठाण्यात नेलं असता मुलीने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आरोपी तरुणी मृणाल किरण पाटील (वय 21) आणि संजना किरण पाटील (वय 40) यांच्याविरुद्ध फिर्यादी सुनीता दळवी यांनी तक्रार दिली होती. सुनीता दळवी आणि आरोपी संजना पाटील व मृणाल पाटील या शेजारी राहतात. दळवी यांच्या कुत्र्याने पाटील यांच्या घरासमोर घाण केली होती, त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.

या वादानंतर संजना आणि मृणाल यांनी दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली होती. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल होत या मायलेकींना पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी मृणालने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा गुन्हा काय असा प्रश्न विचारत उर्मट भाषेत बोलायला सुरुवात केली. यावेळी आरोपी मृणालने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात टाकत तिच्या शर्टाचं बटण तोडलं.

    follow whatsapp