दोन दिवसांच्या सुट्टीनंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज महत्वाचा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना काळात राज्याच्या घटलेलं उत्पन्न आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला राज्य सरकार आज काही दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याव्यतिरीक्त मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही विरोधक आज सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.
