Mumbai: मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्स चॅट केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

मुंबई तक

• 05:47 AM • 23 Nov 2021

एजाज खान, मुंबई मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या टीमने रविवारी रात्री भरतपूरच्या सीकरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झालेल्या शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर […]

Mumbaitak
follow google news

एजाज खान, मुंबई

हे वाचलं का?

मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या टीमने रविवारी रात्री भरतपूरच्या सीकरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झालेल्या शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी तात्काळ पोलीस तक्रार नोंदवल्याने आरोपीला अटक करण्यात क्राइम ब्रँचच्या टीमला यश आलं आहे.

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकविण्यासाठी कसा रचला कट?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी रात्री एक मेसेज आला. हा मेसेज मौसमदीन नावाच्या एका व्यक्तीने केला होता. चॅटिंगमध्ये आपण महिला असल्याचं भासवून त्याने आमदार कुडाळकर यांच्याकडे मदत मागितली. आमदार कुडाळकर देखील मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदार कुडाळकरांच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.

या महिलेने कुडाळकरांशी साधारण 15 सेकंद बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, हा कॉल कट झाल्यानंतर काही वेळाने कुडाळकरांच्या मोबाइलवर याच नंबरवरुन एक व्हीडिओ पाठविण्यात आला. जो एडिट करण्यात आला होता. हा व्हीडिओ पाठवून आरोपीने आमदार कुडाळकर यांच्याकडे तात्काळ 5 हजार रुपयांची मागणी केली. कुडाळकर यांनी देखील फोन-पे वरुन आरोपीला 5 हजार रुपये दिले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच नंबरवरुन मंगेश कुडाळकर यांना फोन आला. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा अश्लील व्हीडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल त्यांच्याकडे 11 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मात्र आमदार कुडाळकर यांनी पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, याच तक्रारीवरुन मुंबई क्राइम ब्रांचच्या टीमने फोन-पे नंबरवरुन आरोपी मौसमदीन याला ट्रेस केलं. या दरम्यान, पोलीस सतत त्याच्या लोकेशनवर नजर ठेवून होतं. जेव्हा मुंबई पोलिसांची टीम राजस्थानमध्ये पोहचली तेव्हा त्यांनी सीकरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि आरोपीला पकडण्यासाठी एक रणनिती तयार केली.

पोलिसांना असा संशय होता की, जर ते दिवसा आरोपीला पकडण्यासाठी लोकेशनवर गेले असते तर आरोपी तिकडून पळून जाण्याची दाट शक्यता होती. अशावेळी पोलिसांनी रात्री 11 वाजेची वेळ निवडली. जेव्हा रात्री पोलीस तेसकी या गावी पोहचले तेव्हा आरोपी हा आपल्या मोबाइलवर चॅटिंग करत होता. तेव्हाच पोलिसांनी त्याला अटक केली.

कोल्हापूर : व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत लाखो रुपयांना लुटलं, ६ जणांना अटक

सध्या हा आरोपी मुंबई क्राइम ब्रांचच्या ताब्यात असून आता त्याची याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. आरोपी नेमकं हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरुन करत होता का? हे देखील आता पोलीस शोधून काढत आहे.

    follow whatsapp