सरकारने मनावर दगड ठेवून Lockdown केला आहे, लोकांना कळकळीची विनंती आहे की…

मुंबई तक

• 01:43 PM • 16 Apr 2021

महाराष्ट्र सरकारने मनावर दगड ठेवून आत्ताचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो आहे की हा लॉकडाऊ यशस्वी करून दाखवा नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकशी संवाद साधत असताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. माणसाचा जीव वाचवणं हे […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र सरकारने मनावर दगड ठेवून आत्ताचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो आहे की हा लॉकडाऊ यशस्वी करून दाखवा नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकशी संवाद साधत असताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. माणसाचा जीव वाचवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीने कोरोनाशी लढा दिला पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

लॉकडाऊन हा काही फक्त आपल्याच राज्यात झालेला नाही. जगभरातल्या देशांमध्ये लॉकडाऊन करावा लागला आहे. युकेमध्ये तर तीनवेळा लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन केला की लोक घरात थांबतात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होते. जर कोरोनामध्ये म्युटेशन बदललं असेल तर आम्ही ट्रिटमेंटची पद्धत बदलायला हवी का? याचीही माहिती आम्हाला या संस्थेने द्यावी.

अनेकांना लॉकडाऊन पटलेला नाही. आम्हालाही लॉकडाऊन लावण्याची हौस मुळीच नाही. लॉकडाऊन लावल्याने संसर्ग रोखण्यास मदत होते. अर्थचक्र थांबलं तरीही चालेल मात्र लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

27 हजार रेमडेसिवीर येतात, मग जातात कुठे? गुजरात सरकारला हायकोर्टाने झापलं

लॉकडाऊन महत्त्वाचा अशासाठी असतो की त्यामुळे अनेकांना घरात थांबता येतं. संसर्ग हा माणूस माणसाला भेटल्यावरच होतो. गर्दीची ठिकाणं निर्मनुष्य राहिली तर कोरोनाचा धोका टळतो. लोकांनी घरात रहावं ही आमची मनापासून इच्छा आहे. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आम्ही जे काही स्वॅब पाठवले आहेत त्यांचं डबल म्युटेशन झालं आहे का? त्याबद्दलची स्पष्टता NCDC ने द्यावी असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

रेमडेसेविरचा तुटवडा जाणवतो आहे त्याबद्दल विचारलं असता राजेश टोपे म्हणाले की, रेमडेसिवीरचा तुटवडा येत्या पाच ते सहा दिवसात कमी होईल. आम्ही त्यासंदर्भातले निर्देश कंपन्यांना दिले आहेत. मुळात रेमडेसिवीरचा उपयोग हा फक्त गंभीर रूग्णांसाठीच करण्यात यावा असंही आवाहन आम्ही केला आहे. लोकांची रेमडेसिवीरबाबत जनजागृती करण्याची गरज आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. रेमडेसिवीर घेतल्याने फक्त रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णालयातले काही दिवस कमी होऊ शकतात. रेमडेसिवीरची गरज लक्षणं नसलेल्या रूग्णांना नसते. या सगळ्या बाबी लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

    follow whatsapp