Maharashtra Weather Updates : थंडी गायब, पावसाची होणार एन्ट्री... 'या' जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावं आणि त्यानुसार नियोजन करावं, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Dec 2024 (अपडेटेड: 24 Dec 2024, 11:50 AM)

follow google news

राज्यात गेलया काही दिवसांपासून असलेली थंडीची लाट अचानक गायब झाली असून, बऱ्याच ठिकाणी कालपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी काहीशी दमट हवा जाणवत होती. त्यानंतर आता राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?

राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; 27 डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि 28 डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> Vinod Kambli Admitted in Thane Hospital: विनोद कांबळी यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
 

राज्यात आज कुठे किती तापमान? 


छत्रपती संभाजीनगर : 25.6°
कोल्हापूर : 26°
महाबळेश्वर : 15.6°
मुंबई : 27°
पुणे : 25°
परभणी : 19.4°
मालेगाव, नाशिक : 19°
अहमदनगर : 19°
जेऊर, सोलापूर : 19°
नांदेड : 25°


    follow whatsapp