Vinod Kambli Admitted in Thane Hospital: विनोद कांबळी यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल
Vinod Kambli Admitted in Thane Hospital: माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली असून त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विनोद कांबळीला रुग्णालयात करण्यात आलं दाखल
अचानक खालावली विनोदची प्रकृती
मागील अनेक दिवसांपासून विनोद कांबळी आजारी
Vinod Kambli Admitted in Thane Hospital: ठाणे: माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे. तसंच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांबळीला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (former indian cricketer vinod kamblis health deteriorated admitted to thane hospital)
शनिवारी कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याच दिवशी त्याला तातडीने ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण आता तीन दिवस उलटून गेल्यावरही त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा नसल्याचं समोर आलं आहे. सध्या कांबळीची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचं समजतं आहे.
अशी होती कांबळीची क्रिकेट कारकीर्द
भारतीय संघाचा क्रिकेटपटू विनोद कांबळी हा काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरसोबत एका जाहीर कार्यक्रमात दिसला होता. ज्याचे अनेक व्हिडिओ हे व्हायरल झाले होतो, ज्यामध्ये तो सचिनला त्याच्या बाजूला बसण्यास सांगत होता.
हे ही वाचा>> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..
दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याचं काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क येथे अनावरण करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात सचिन आणि विनोदची भेट झाली होती. या कार्यक्रमातच कांबळीची प्रकृती ठीक नसल्याचं दिसून आलं होतं. जेव्हा कांबळीचा तेंडुलकरसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती.










