Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रात दिवसभरात सापडले साडे तीन हजाराहून अधिक नवे रुग्ण

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता अद्यापही कायम आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)3623 नवे रुग्ण सापडले आहेत. अद्याप महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा अद्याप कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46 रुग्णांचा मृत्यू […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:32 PM • 12 Sep 2021

follow google news

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता अद्यापही कायम आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)3623 नवे रुग्ण सापडले आहेत. अद्याप महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा अद्याप कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

हे वाचलं का?

गेल्या 24 तासात राज्यात 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,38,142 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 3623 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही महिन्यात रुग्णांची आकडेवारी घटत होती. पण आता गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा 3 ते 4 हजार रुग्ण पुन्हा एकदा सापडत आहेत. राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 50 हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात 12 सप्टेंबर रोजी 3623 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 63,05,788 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.04 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,59,79,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,97,877 (11.61 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,207 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1892 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 50,400 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 5 हजार 244

  • ठाणे (Thane) – 7 हजार 979

  • पुणे (Pune) – 13 हजार 018

  • नागपूर (Nagpur) – 95

  • नाशिक (Nashik)- 1 हजार 047

  • कोल्हापूर (Kolhapur) – 1 हजार 243

  • अहमदनगर (Ahmednagar) – 6 हजार 027

  • सातारा (Satara) – 5 हजार 637

  • सांगली (Sangli)- 1 हजार 639

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 584

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 13 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे आणि सातारा जिल्ह्यात 5 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 5 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

‘कोरोना म्हणजे थोतांड’, मास्कविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाचा Covid-19 मुळेच मृत्यू

मुंबईत दिवसभरात सापडले 354 रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 496 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 188 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 46 हजार 346 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. डबलिंग रेट 1210 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp