साताऱ्यात एकाची दगडाने ठेचून हत्या; रस्त्यात अडवून टोळक्यानं केला हल्ला

मुंबई तक

• 09:47 AM • 08 Oct 2021

एरवी राजकीय घटनामुळे चर्चेत राहणाऱ्या साताऱ्यात एकाची दगडाने ठेचून निघृर्ण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. घटनेचं वृत्त पसरता परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी आऱोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत. सातारा शहरातील दिव्यानगरी येथे संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय ४५, रा. दिव्यनगरी) यांचा टोळक्याने लाठ्या व दगडाने ठेचून खून केला. सकाळी ११ वाजता […]

Mumbaitak
follow google news

एरवी राजकीय घटनामुळे चर्चेत राहणाऱ्या साताऱ्यात एकाची दगडाने ठेचून निघृर्ण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. घटनेचं वृत्त पसरता परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी आऱोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत.

हे वाचलं का?

सातारा शहरातील दिव्यानगरी येथे संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय ४५, रा. दिव्यनगरी) यांचा टोळक्याने लाठ्या व दगडाने ठेचून खून केला. सकाळी ११ वाजता दिव्यनगरी रस्त्याने जात असताना रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाण- घेवाण व जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचं समोर येत आहे. संशयितांनी लाठ्या व दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात संतोष सुळ गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला असून, संशयितांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत.

मुंबईतील NCB अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक

१५ ते २० दिवसांपूर्वीच साताऱ्यात एकाने बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली होती. फलटण तालुक्यातील जिंती गावात हा प्रकार घडला होता. मोन्या निंभोरे असं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव होतं. मोन्या निंभोरेच्या बहिणीने आंतरधर्मिय विवाह केला होता. याच रागातून त्याने बहिणीचा नवरा शकील अकबर शेख यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं.

    follow whatsapp