ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झालं. रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्वेकडील राहत्या घरी निधन त्यांची प्राणज्योत मालवली. आज (१४ नोव्हेंबर) दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:54 AM • 14 Nov 2022

follow google news

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झालं. रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्वेकडील राहत्या घरी निधन त्यांची प्राणज्योत मालवली.

हे वाचलं का?

आज (१४ नोव्हेंबर) दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले.

सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे.

‘निवडूंग’ (१९८९), ‘मधुचंद्राची रात्र’ (१९८९), ‘जसा बाप तशी पोर’ (१९९१), ‘ईश्वर’ (१९८९), ‘नरसिम्हा’ (१९९१) या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

    follow whatsapp