Yogesh Kadam Accident : रामदास कदम यांचे मातोश्री अन् अनिल परबांवर आरोप

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांचा काल (शुक्रवारी) रात्री पोलादपुरनजीक भीषण अपघात झाला. यात सुदैवाने ते सुखरुप बचावले आहेत. मात्र हा अपघात होता की घातपात असं म्हणतं त्यांनी या अपघातावर शंका व्यक्त केली. त्यापाठोपाठ आता माजी मंत्री आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनीही योगेश कदम यांच्या अपघातावर शंका […]

Mumbai Tak

मुंबई तक

07 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

follow google news

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांचा काल (शुक्रवारी) रात्री पोलादपुरनजीक भीषण अपघात झाला. यात सुदैवाने ते सुखरुप बचावले आहेत. मात्र हा अपघात होता की घातपात असं म्हणतं त्यांनी या अपघातावर शंका व्यक्त केली. त्यापाठोपाठ आता माजी मंत्री आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनीही योगेश कदम यांच्या अपघातावर शंका व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

योगेश कदम यांचा घातपात करण्याचा प्रयत्न होता. मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परब यांच्यासारख्या मंडळीनी हे कृत्य केल्याचा माझा संशय आहे, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले, मागे-पुढे पोलिसांची गाडी आणि एखादा डंपर मधल्याच गाडीला ठोकतो, पुढे फरफटत नेतो, थोडं जर चुकलं असतं तर गाडी दरीत गेली असती. हे सुनियोजित कोणी केलं आहे की काय हा माझा संशय आहे.

अनिल परब आणि मातोश्रीवर निशाणा साधताना रामदास कदम पुढे म्हणाले, अनिल परब यांनी मातोश्रीच्या आशीर्वादाने योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता योगेश कदम यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता की काय? हा माझ्या मनात संशय आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणार आहे, या सर्व प्रकरणाची ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यास भाग पडणार, असंही रामदास कदम म्हणाले.

योगेश कदमांनीही व्यक्त केली शंका :

दरम्यान, हा अपघात (Car Accident) झाल्यानंतर बोलताना योगेश कदम म्हणाले, हा नेमका अपघातच होता का याबाबत त्यांना शंका आहे. अपघाताचा पॅटर्न नॉर्मल अपघातासारखा वाटत नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे जी सूचना किंवा जी माहिती द्यायची आहे ती सर्व कालच दिली आहे. पोलीस यंत्रणा व्यवस्थित माहिती घेऊन चौकशी करतील आणि रायगड जिल्ह्याच्या एसपींशी देखील माझं बोलणं झालं आहे.

चौकशी करणारे जे काही अधिकारी आहेत माझ्याकडून जी माहिती द्यायची, ज्या शंका मला होत्या. त्या सगळ्या गोष्टी मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. माझ्या मागे आणि पुढे दोन्हीकडे पोलिसांची गाडी असताना देखील मध्ये येऊन माझ्या गाडीला एवढ्या जोरात धडक देणं. जे खरं तर अपघात स्थळ नव्हतं. ते पण मोठा डंपर.. 12 टायरचा डंपर होता. पूर्णपणे कोळशाने भरलेला डंपर होता.’

    follow whatsapp