बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ इच्छा मनसेनं पूर्ण केली : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई तक

• 02:56 PM • 27 Nov 2022

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे कित्येक वर्ष म्हणतं होते, मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजे. इतकी वर्षे चालू असलेला हा प्रश्न आणि बाळासाहेब ठाकरेंनी अनेकवेळा बोलून दाखवलेली इच्छा आपण पूर्ण केली, असं म्हणतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे कित्येक वर्ष म्हणतं होते, मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजे. इतकी वर्षे चालू असलेला हा प्रश्न आणि बाळासाहेब ठाकरेंनी अनेकवेळा बोलून दाखवलेली इच्छा आपण पूर्ण केली, असं म्हणतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर गट अध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर देखील भाष्य केलं.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंवर काय म्हणाले राज ठाकरे?

कोणतही काम न करणारे, फक्त हिंदुत्व हिंदुत्व करत बसणारे कुठे होते? मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीच कारण दिलं. पण एकनाथ शिंदेंनी रात्रीत कांडी फिरवली. आता फिरतायत सगळीकडे. स्वतःच्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात धरायचा आणि बागेत कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी करत नाही.

मराठीच्या मुद्दावर असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्दायावर असो. ही लोकं करणार काहीच नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? नाहीच. कारण कधी भूमिकाच घेतली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मला फक्त सत्तेत बसायचं, म्हणायचं, असाही टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पुन्हा हनुमान चालिसाचा आदेश :

यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हनुमान चालिसाचा आदेश दिला. ते म्हणाले, अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. पण जिथे भोंगे चालू असतील, तिथे पोलिसांकडे तक्रार द्या. पोलिसांनी दखल घेतली नाही, तर पोलिसांवर न्यायालयाच्या अवमानाची केस होईल. पोलिसांना भेटा. पोलिसांनी काही केलं नाही, तर मोठ्या ट्रकवर, मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.

    follow whatsapp